🔰वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज सेवा मंडळ छत्रपती नगर,तुकडोजी नगर तुकूम चंद्रपूर द्वारा भव्य योग शिबीर आयोजित
खबरकट्टा / चंद्रपूर :
शरीर आणि मनाचे स्वास्थ्य जोपासून अधिक समृद्ध आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योग मार्गदर्शक ठरत असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होत आहे. त्यासाठी वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज सेवा मंडळ छत्रपती नगर,तुकडोजी नगर तुकूम चंद्रपूर द्वारा दि.07/10/2021 पासून 13/10/2121 पर्यंत भव्य योग शिबीर आयोजित केले आहे.शिबिराचे उदघाट्न गुरुवार 07/10/ 2021 ला सकाळी 5.30 ते 7.00 होणार आहे.
भव्य रोग शिबिरात योग या विषयाची शास्त्रीय माहिती, योगाचे महत्त्व व फायदे या विषयी नामवंत तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.भव्य योग शिबीराच्या कार्यक्रमाला अध्यक्ष सौ.अनु ताई रा.दहेगावकर अध्यक्ष वं. रा. तुकडोजी महाराज सेवा मंडळ प्रमुख अतिथी,मा. सुरेशभाऊ पचारे नगरसेवक तथा गटनेता, मनपा, चंद्रपूर योग शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून श्री. भगवाणजी पालकर, पतंजली योग समिती,जिल्हा प्रभारी, भ्रह्मपुरी,श्री. विजयजी चंदावार अध्यक्ष BST चंद्रपूर,श्री. शरदजी व्यास संघटन मंत्री, चंद्रपूर श्री.संजीव व्यास युवा प्रभारी चंद्रपूर,श्री. सुधाकर श्रीरपूरवार तालुका प्रभारी चंद्रपूर श्री हरिदासजी कापटे योग शिक्षक चंद्रपूर उपस्थित होत योगा विषयी मार्गदर्शन करणार आहेत.