खबरकट्टा /चंद्रपूर :
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी नरसंहाराचा निषेध करण्यात आला तसेच भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
दिनांक ४ ऑक्टो २०२१ रोज सोमवार ला दुपारी ३:३० वा प्रा. सूर्यकांत खनके अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल यांच्या मार्गदर्शनाखाली जटपुरा गेट चंद्रपूर येथे निषेध नोंदविण्यात आला.
याप्रसंगी सौ.स्वाती त्रिवेदी अध्यक्ष महिला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दल व सौ.लता बारापात्रे महिला शहराध्यक्ष काँग्रेस सेवा दल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले . तसेच प्रामुख्याने नम्रता ताई ठेमस्कर प्रदेश सचिव महिला काँग्रेस,श्री.संजय बिजवे उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दल श्री.भुपेंद्र खनके उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दल श्री.षडानन पहानपटे सोशल मीडिया प्रमुख चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दल परविन सय्यद उपाध्यक्ष महिला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल श्री.सागर वानखेडे अध्यक्ष चंद्रपूर तालुका काँग्रेस सेवा दल ,सौ शितल काटकर शहराध्यक्ष सेवा फाउंडेशन, सौ.मंगला शिवरकर, पूजा अहुजा, मीनाक्षी गुजरकर, माला माणिकपुरी, सुषमा बनसोड, सविता मांडवकर ,रशिका वाघाडे ,माधुरी घुघ्घुसकर व सर्व सेवादल पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.