जिल्ह्याला मिळाल्या नवीन 23 रुग्णवाहीका:#Dio - chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



जिल्ह्याला मिळाल्या नवीन 23 रुग्णवाहीका:#Dio - chandrapur

Share This



खबरकट्टा /चंद्रपूर :


चंद्रपूर दि. ५ ऑक्टोबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते अद्यावत २३ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पोलीस ग्राउंड, चंद्रपूर येथे पार पडला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य प्रसार, व प्रादुर्भाव थोपविण्याकरिता या रुग्णवाहिकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. तसेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आणि दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी या रुग्णवाहिकांची मदत होणार आहे. सदर 23 रुग्णवाहिकापैंकी 20 रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राला तर उर्वरित 3 रुग्णवाहिका जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने आतापर्यंत जिल्ह्याला 47 रुग्णवाहिका व 30 लसीकरण वाहने अशी एकूण 77 रुग्णवाहिका आरोग्यसेवेसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी 20 रुग्णवाहिका खनिज निधीतून, 7 रुग्णवाहिका राज्य शासनाकडून, 27 रुग्णवाहिका महापारेषण विभागाकडून तर 23 रुग्णवाहिका राज्यशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.

Pages