🔰चाकुचा धाक दाखवुन वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील मंगळसुञ व कानातील बीऱ्या लंपास केल्या
खबरकट्टा /चंद्रपूर :
चिमूर तालुक्यातील नेरी - सीरपुर रोडवरील पहाडी जवळ रस्त्यालगत असलेल्या ओवाळा रीठ शेतशीवारातील शेतात काम करीत असलेल्या महीलेच्या अंगावरील दागीने अज्ञात चोराने चाकुचा धाक दाखवून दागीने हीसकावून जंगलाच्या दीशेने पसार झाला.
पांढरवाणी येथील रहीवासी बारजाबाई राजेराम जांभुळे वय ७० वर्ष हीचे ओवाळा रीठ शेतशीवार सीरपुर पहाडी जवळ असलेल्या शेतात धानाची नीदंन करीत असतानी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अज्ञात चोर दुचाकीवरून आला. वयोवृद स्ञीला एकटे शेतात काम करीत असताना बघुन व याच संधीचा फायदा घेउन चाकुचा धाक दाखवुन त्या वयोवृध्द स्ञीच्या अंगावरील ३.५० ग्रम मंगळसुञ व कानातील बीऱ्या २ ग्रम असा एकुण ५.५ ग्रम दागीने काढुन घेउन ब्रम्हपुरी वन परीक्षेञ अंतर्गत येत असलेल्या सीरपुर जंगलातुन पसार झाला . त्या चोराने आपली दुचाकी त्या शेताजवळ ठेवून पसार झाला.ही दुचाकी हीरो होंडा कंपनीची असुन नागपुर पासींगची आहे . गाडी क्रमांक एम.एच-.३१ सी .एफ -६१६ ही आहे . ही दुचाकी चोरीची असल्याचे पोलीसांनी सांगीतले .
ही घटना घडल्यावर त्या महीलेने आरडा ओरड केली. शेताजवळील शेतकरी येवुन नेरी पोलीस चौकीला त्या महीलेला आणले . नेरी चौकीचे इंचार्ज एक.पी.आय.मंगेश मोहोड यांनी वयोवृध्द स्ञीची आपबीती ऐकून तात्काळ आपले चौकीशीचे सुञ हलवीले .घटना स्थळी जाऊन पोलीसांनी पुर्ण चौकशी केली . एक पोलीसांची टीम त्या भामट्या चोरट्याला शोधण्यासाठी तळोधी मार्गे गेली आहे .
ह्या घटनेची माहीती होताच उपवीभागीय पोलीस अधीकारी मीलींद शींदे हे तात्काळ ब्रम्हपुरीवरून येवुन या घटनेचा तपास जलदगतीने करा असा नीर्देश चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभणे यांना दीले . चिमूर चे ठाणेदार मनोज गभणे यांनी त्या चोरट्याला पकडण्यासाठी मोठी पोलीस यंञणा लावली आहे . नेरी चौकीचे इंचार्ज एक.पी.आय.मंगेश मोहोड व त्यांची पुर्ण टीम लागली आहे .या अज्ञात चोर पर्यावरण गुन्हा दाखल केला आहे. ऐन वेळी एका शेतकरी महीलेचे दागीने गेल्याने या महीलेवर मोठे संकट कोसळले आहे .