🔰भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरी तालुक्यातील वायगाव येथे फलक अनावरण कार्यक्रम संपन्न
खबरकट्टा /चंद्रपूर :
राज्याचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांची युवा संकल्प यात्रा सुरू आहे. या अंतर्गत भा.ज.यु.मो ब्रम्हपुरी तालुक्यातील वायगाव येथील फलक अनावरण कार्यक्रम मा.आशीषभाऊ देवतळे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी आशिषभाऊ देवतळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.