दिवसा व रात्रो घरफोडी करणाऱ्या महिला व अट्टल घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीकडून एकूण 1,45,200/रु चा मुद्देमाल हस्तगत:#LCB - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



दिवसा व रात्रो घरफोडी करणाऱ्या महिला व अट्टल घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीकडून एकूण 1,45,200/रु चा मुद्देमाल हस्तगत:#LCB

Share This
⭕️स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची प्रशंनीय कामगीरी


खबरकट्टा /चंद्रपूर :


मागील काही दिवसापासून चंद्रपूर जिल्यात वरोरा शहरात दिवसा रात्रो घरफोडी होणे नित्याची बाब झाली आहेत. अशा गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते या निर्देर्नशानुसार पोलीस निरीक्षक खाडे स्थागुशा चंद्रपूर यांनी एक विशेष पथक नेमून त्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक दिवसापासून सापळा रचला. दिनांक 01/10/21 रोजी दुपारी 11/30 ते 13 /30 वा. सुमारास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली कि नेहरू शाळेजवळ घुटकाळा वार्ड येथे राहणारी अप्सरा ईलियास शेख वय 23 वर्ष ही आपल्या जवळ सोन्याचा गोप घेऊन विक्रीसाठी सफारा लाईन चंद्रपूर येथे संशयास्पद स्तिथीत फिरत आहे. मिळालेल्या खबरेवरून तात्काळ गुन्हे शोध पाथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना पाचारण करून पथकामार्फत सदर महिला आरोपीचा सराफ लाईन येथे शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. सदर महिलेस विश्वासाने विचारपूस केली असता तिने व तिचा मित्र घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार नामें फैजूल्ला खान रा. रहमत नगर चंद्रपूर हे दोघेही वरोरा येथे किरायाची रूम करून पोस्टे वरोरा हद्दीतील अभ्यंयकर वार्ड येथे एका घरातिल आलमारीत ठेवलेले सोनेचांदीचे दागिने चोरी केल्याची कबुली देवून गुन्ह्याबाबत सादर महिलेने हकीकत कथन केली. सदर महिले बाबत घरफोडी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार याचा शोध घेणे सुरु आहे.

सदर महिलेच्या ताब्यातील चोरी केलेले सोन्याचे गोप, मंगळसूत्र एकूण वजन 20.240 ग्राम व चांदीचे पायपट्टी व जोळवे एकूण वजन 56.700 ग्राम असून एकूण 97,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील महिले आरोपीकडून खालील प्रमाने गुन्हा उघडकीस आला आहे.


1) पोलीस स्टेशन वरोरा अप. क्रं 747/21 कलम 380 भादवी.
दि.03/10/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा हे पेंढोलींग करीत असता दुर्गा मंदिर बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे रेकॉर्डवरील घरफोडीचा गुन्हेगार गौतम उर्फ कोहली गणेश बिश्वास वय 22 वर्ष रा.फुकटनगर एकटा चौक यांचे ताब्यातून एक चांदीची चाळ व एक चांदीचा छल्ला एकूण वजन 116.200 ग्राम. दोन सोन्याचे बदाम अंगठ्या वजन 10.00 ग्राम असा एकूण 57,200/- रुपयचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नमूद आरोपीने जानेवारी महिन्यात पागलबाग नगर चंद्रपूर परिसरातून रात्रौला घराचा टाळा तोडून सोन्याचांदीचे दागिने चोरलेले आहे.ताब्यातील आरोपीकडून खालील प्रमाणे गुन्हा उघडकीस आला आहे.

2)पोलीस स्टेशन रामनगर अप. क्रं.064/21 कलम 454,457,380 भादवी

सदरची यशस्वी कामगिरी गा. श्री. अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलिस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचा मार्गदर्शनात पो. नि. बाळासाहेब खाळे स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उप निरीक्षिक संदीप कापडे, पोलीस उए निरीक्षक अतुल कावळे, पो.हवा संजय आतकूलवार. पो. कॉ. नितीन रायपूरे, गोपाल आतकुलवार. कुंदनसिंग बाबरी, प्रांजल झिशपे, रवींद्र पंधरे, म. पो. शि. अपर्णा मानकर यांनी केली.

Pages