लॉयड्स मेटल कंपनीतील मृतक कामगाराच्या कुटुंबीयास आर्थिक मदत:#help - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



लॉयड्स मेटल कंपनीतील मृतक कामगाराच्या कुटुंबीयास आर्थिक मदत:#help

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर :


घुगुस : रविवार 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रयास सभागृहात घुग्घुस येथील लॉयड्स मेटल कंपनीतील मृतक कामगार सुमरण सोनबोईर यांच्या कुटुंबीयास राजेंद्र अडपेवार कामगार परिवार व भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी आर्थिक मदत दिली.

लॉयड्स मेटल कंपनीतील कामगार सुमरण सोनबोईर यांच्या कंपनीत अपघात झाला होता जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते परंतु त्यांच्या उपचारादरम्यान दिनांक 29/05/2021 रोजी मृत्यू झाला.

लॉयड्स मेटल कंपनीतील राजेंद्र अडपेवार कामगार परिवार व भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून मृतक कामगाराच्या कुटुंबीयास आर्थिक मदत दिली.

यावेळी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, मृतक कामगाराची पत्नी श्रीमती अनुसया सोनबोईर त्यांचा मुलगा रवी सोनबोईर, भाजपाचे संजय भोंगळे राजेंद्र अडपेवार कामगार परिवाराचे सुधीर बावणे, पंकज रामटेके, शंकर कलवल, लक्ष्मण ताटपेल्ली, राजकुमार मुळेवार, लक्ष्मण येनगंदला, सुखदेव आगदारी, देवकुमार सलामे, शालिक शिवरकर, अंकुश बर्रे उपस्थित होते.

Pages