खासदार व शिवसेनेची बाईक रॅली ठरली लक्षवेधी
खबरकट्टा /चंद्रपूर :
लाखीमपूर येथे केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलाने आठ शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले. मात्र याची दखलही देशाच्या पंतप्रधान यांनी घेतली नाही, याविरोधात महा विकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक पुकारली.
चंद्रपुरात आज महाराष्ट्र बंद दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. महाविकास आघाडी च्या वतीने आज चंद्रपूरात शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शंभर टक्के बंद करण्यात आले.