आम आदमी पार्टी जिल्हा चंद्रपुर तर्फे महाराष्ट्र बंद मध्ये सक्रिय सहभाग :#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आम आदमी पार्टी जिल्हा चंद्रपुर तर्फे महाराष्ट्र बंद मध्ये सक्रिय सहभाग :#chandrapur

Share This


खबरकट्टा /चंद्रपूर :

दि .11 ऑक्टोबर 2021


आम आदमी पार्टीने केंद्र सरकारने बनवलेल्या राक्षसी कृषी कायद्यांना पहिल्या दिवसापासूनच प्रखर विरोध केलेला आहे. आपण देशातले सर्व आंदोलनकर्ते शेतकरी व संघटनांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत.केंद्रसरकारने तीन काळे कायदे रद्द करावे आणि उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खेरी येथील झालेल्या किसान अत्याचार बाबत बंद पुकारण्यात आले होते.

आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी प्रमुख मार्गाने रॅली काढून काही दुकाने बंद करण्यात आली लखिमपुर खेरी येथे भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने अंगावर गाडी घातल्यामुळे शहीद व जखमी झालेले शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी तसेच भाजपा सरकारने पास केलेले शेतकरी विरोधी राक्षसी कायदे मागे घ्यावेत यासाठी येत्या सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या "महाराष्ट्र बंद" ला सक्रिय सहभागी होऊन. आम आदमी पार्टी जिल्हा चंद्रपुर सहभागी होऊन कडकडीत बंद करण्यात आले.

चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी संविधनिक मार्गाने या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी झाले यावेळी मार्कसवादी काॅम्युनिस्ट पार्टी,समाजवादी पार्टी ,भ्रष्टाचार विरोधी न्यास भारतीय कीसान सभा यानी सहभाग नोंदवला.

यावेळी आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष सुनिल देवराव मुसळे युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार जिल्हा सचिव संतोष दोरखंडे , श्री.राजेश चेडगुलवार जिल्हा महानगर सोशल मीडिया हेड,श्री. भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष, श्री. सूनिल भोयर महानगर संघटन मंत्री व इंचार्ज ,श्री राजू कुडे सचिव महानगर, श्री विकास खाडे सहसचिव घुग्गुस, श्री सागर बिऱ्हाडे , श्री सोनू शेट्टीवार, श्री आशिष पाझारे , श्री योगेश आपटे उपाध्यक्ष, श्री राजू कुडे सचिव, श्री. परमजित सिंघ झगडे , आप जिल्हा संघटन मंत्री, श्री सोनल पाटील भद्रावती तालुकाध्यक्ष, श्री अमित बोरकर घुग्गुस शहर अध्यक्ष, श्री शंकर धुमाळे ऑटो जिल्हाध्यक्ष ,श्री अजय डुकरे , जेष्ठ कार्यकर्ता वामनराव नंदूरकर, जेष्ठ कार्यकर्ते मधुकरराव साखरकर, अशरफ भाई, श्री अभिषेक सपळी, श्री श्री सुमित हस्तक ,श्री निखिल बारसागडे , श्री राहील बेग, श्री अंकुश राजूरकर, श्री महेश सिंघ , इत्यादी अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Pages