वणी ब्रेकिंग : बेटी फॉउंडेशन च्या नावावर बेटी विक्री : 15दिवसांचे बाळ विक्री करताना रांगेहाथ अटक : फॉउंडेशन च्या नावे पुरस्कार विकण्याचाही विक्रम : पाच हजारात विकले जातात पुरस्कार #wani - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



वणी ब्रेकिंग : बेटी फॉउंडेशन च्या नावावर बेटी विक्री : 15दिवसांचे बाळ विक्री करताना रांगेहाथ अटक : फॉउंडेशन च्या नावे पुरस्कार विकण्याचाही विक्रम : पाच हजारात विकले जातात पुरस्कार #wani

Share This


बाळ दत्तकसाठी उपलब्ध आहे असा मेसेज यवतमाळ जिल्ह्यात व्हायरल झाल्यापासून 36 तासात स्टिंग ऑपरेशन करून 15 दिवसाच्या मुलीची विक्री करणाऱ्या टोळीस अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बाल कल्याण समिती अध्यक्ष यांनी स्वतः डमी पालक बनून ही घटना पुढे आणली आहे. तसेच अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण यंत्रणांनी योग्य समन्वय साधत आज संध्याकाळी बाळालाही ताब्यात घेतले आहे.

खबरकट्टा /यवतमाळ :

सविस्तर माहिती नुसार काल दिनांक 30 सप्टेंबर ला बेटी फाऊंडेशन वणी या संस्थेच्या महिला अध्यक्षा प्रीती माडेकर - दरेकर सहीत इतर 5 व्यक्तींना 15 दिवसाचे बाळ बेकायदेशीररित्या विक्री करताना अटक झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे बेकायदेशीर रित्या सामाजिक संस्थेच्या नावाचा आधार घेत पुरस्कार विकत देण्यास ही संस्था पंचक्रोशीत नवाजलेली असून मागील रविवारीच या संस्थेद्वारे अश्या पुरस्कार वाटपाचा कार्यक्रम आटोपल्याची चर्चा रंगात असतानाच नवजात बाळ विक्री प्रकरणात या फॉउंडेशन च्या अध्यक्षास अटक झाल्याने सामाजिक संस्थांनाच्या नावावर सऱ्हास चाललेली लूट चिंतेचा विषय आहे.

नाव बेटी फॉउंडेशन,काम बेटी विक्री :



बेटी फॉउंडेशन च्या सदस्यांनी बाळ दत्तक देण्यास उपलब्ध आहे असा संदेश काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर व्हायरल केला. सदर मेसेज अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी वाचल्यावर त्यांनी व्हायरल मेसेजची खात्री करण्यासाठी डमी पालक सदर संस्थेला फोन केला. तसेच महिला व बालकल्याण आयुक्त यांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शांआखाली डमी पालक म्हणून विक्री करणाऱ्या संस्थेला बाळ विकत घेण्याची योजना आखली.

त्यानुसार 30 सप्टेंबर ला अवैध बाळ 3.5 लाख रुपयात दत्तक व विक्री करण्याची प्रक्रिया सुरू असताना, या 15 दिवसाच्या मुलीस प्रत्यक्ष स्टिंग ऑपरेशन करून अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील बाल न्याय यंत्रणे द्वारे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. तसेच संबंधित बाळाचे आई- वडील, आणि यात सहभागी बेटी फाउंडेशनच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच बाळाला ताब्यात घेण्यात आले असून बाललगृहात ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याच्या बाल कल्याण समिती अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी, दोन्ही जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणा, पोलीस विभाग यांच्यामुळे हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाले आहे.

कारवाई दरम्यान यवतमाळ बाल कल्याण समिती अध्यक्ष अडव्होकेट सुनील घोडेस्वार, जिल्हा परिविक्षा अधिकारी गजानन जुमळे, अकोला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्त्या वनिता शिरफुलें, रविंद्र गजभिये महिला व बाल विकास कर्मचारी, ठाणेदार व सर्व पोलीस टीम उपस्थित उपस्थित होती.

या कारवाईसाठी कार्यक्रम व्यवस्थापक, बिरसिस मॅडम, जिमबा मरसाळे व ज्योती कडू यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Pages