पप्पू पास हो गया : 235 दिवसाच्या डेरा आंदोलनाला अखेर यश #pappu-deshmukh - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पप्पू पास हो गया : 235 दिवसाच्या डेरा आंदोलनाला अखेर यश #pappu-deshmukh

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील 235 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर जनविकास कामगार सेनेच्या सुरु असलेल्या चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 500 जवळपास कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळालेला आहेत.

मागील सोळा महिण्यापासून कामगारांचे सात महिन्याचे वेतन थकीत आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2021 पासून कामगारांनी काम बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर मुलं -बाळ व कुटुंबासह जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात डेरा आंदोलन सुरु केले होते. वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत दर्शना झाडे, सविता दुधे, माधुरी खोब्रागडे व निशा हनुमंते या कामगारांनी चंद्रपूरच्या औद्योगिक न्यायालया मध्ये स्थगित आदेश मिळवण्यासाठी अर्ज केला होता.


औद्योगिक न्यायालयामध्ये जवळ पास तीन महिण्यापासून या अर्जावर तीन महिण्यापासून या अर्जावर नियमित सुनावणी सुरु होती.संपूर्ण डेरा आंदोलनाचे भवितव्य या प्रकरणाच्या निकालावर अवलंबून होते. अखेर 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी च्या दरम्यान न्यायालयाने या प्रकरणामध्ये स्थगिती दिली. कामगारांचे थकीत वेतन एक महिन्याच्या आत न्यायालयात जमा करण्यात यावे तसेच सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे असे आदेश सुद्धा न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेले आहे.

Pages