राज्यात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागणार असून लवकरच राज्यात शिक्षण विभागात नवीन शिक्षक पदांची भरती होणार असल्याचे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून मोठी घोषणा केली आहे.
त्यांनी ट्वीट करीत सांगितले की, राज्यातल्या शिक्षण विभागात एकूण 2062 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार आहे. यामध्ये शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
एक चांगला समाज निर्माण करण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो.आई-वडिलांसोबतच शिक्षक आपल्या जीवनात मार्गदर्शक व दिशादर्शकाची भूमिका बजावतात.कोरोना काळातही शिक्षकांनी घरोघरी शिक्षण पोहोचवले.या निर्हेतुक कार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी याहीवर्षी आपण #ThankATeacher उपक्रम राबवत आहोत. pic.twitter.com/rpTp6mntbD
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 2, 2021
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंतीक्रमावर 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!”
राज्यात सद्यस्थितीत एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार पदे रिक्त आहेत. टप्प्याटप्प्यानं शिक्षण विभागात ही जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येईल.