चंद्रपूर-संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात गुणवत्तावाढीसाठी योगदान देऊन सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्याच्या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या इंडियन रिसर्च अँड एज्युकेशनल फाउंडेशन वर्धा या संस्थेच्या च्या वतीने शिक्षक दिनाच्या शुभमुहूर्तावर 5 सप्टेंबर 2021 ला 12 वाजता संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणात शिक्षकाची भूमिका या महत्वपूर्ण विषयावर आभासी पद्धतीने राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
या सेमिनारमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकीय विचारवंत व आंतरराष्ट्रीय परराष्ट्र धोरणाचे गाढे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळणकर व मुंबई विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक व संशोधन शास्त्रातील तज्ञ मार्गदर्शक डॉ. विवेक बेल्हेकर मार्गदर्शन करणार असून या सत्राचे अध्यक्षस्थान नागपूर येथील श्री बिंझानी नगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व प्रसिद्ध राजकीय विश्लेषक डॉ. संदीप तोंडुलवार हे भूषवणार आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने संशोधन व शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमिका, बदल, कर्तव्य आणि योगदान या विषयावर सर्वंकष आणि महत्वपूर्ण चिंतन होणार आहे. संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेमिनारचे संयोजक म्हणून डॉ संतोष डाखरे व संयोजन सचिव म्हणून डॉ.दिपाली घोगरे या आहेत.
तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त प्राध्यापकांनी, विचारवंतांनी, संशोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभागी होण्याचे आवाहन इंडियन रिसर्च अँड एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप काळे,उपाध्यक्ष डॉ. संजय गोरे,सचिव डॉ.मंगेश आचार्य,सहसचिव डॉ. रवी धारपवार आणि फाऊंडेशनचे संचालक सर्वश्री डॉ. राम सवणेकर, डॉ. संदीप वाघुले, डॉ.रिता दांडेकर ,डॉ.प्रविण गुल्हाने, डॉ.संजय पाटील, डॉ.कंठेश्वर ढोबळे,डॉ. रावसाहेब काळे यांनी केले आहे.