अभिनेत्री पायल रोहतगी वर कठोर कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस ची मागणी महागाई च्या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी असे विडिओ जाणीवपूर्वक वायरल करण्याचे भाजप ट्रोल आर्मी चे उद्योग महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांची केंद्र सरकारवर टीका #namrata-themaskar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अभिनेत्री पायल रोहतगी वर कठोर कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस ची मागणी महागाई च्या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी असे विडिओ जाणीवपूर्वक वायरल करण्याचे भाजप ट्रोल आर्मी चे उद्योग महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांची केंद्र सरकारवर टीका #namrata-themaskar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


बिग बॉस फ्रेम आणि तथाकथित अभिनेत्री पायल रोहतोगी ही स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कट्टर समर्थक म्हणवून घेते. तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारीत केला. सध्या तो व्हिडीओ मोठया प्रमाणात वायरल होत आहे. त्यात या नटीने कुठल्याही पुराव्या शिवाय महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह संपूर्ण गांधी कुटुंबाची बदनामी करणारा तथ्यहीन व्हिडीओ प्रसारीत केला आहे.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या जडणघडणीत राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे मोठे योगदान आहे.




महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले, असे असतांना अभिनेत्री पायल रोहतगी हिने बदनामीकारक विडिओ प्रसारीत करून लोकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमुळे सामाजिक, राजकीय आणि धार्मिक तेढ निर्माण होण्याची भीती असल्याने पायल अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी पत्रकार परिषदेत केली. या संबंधीत तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या कडे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून करण्यात आली आहे. विषय केवळ पायल रोहतगी हा नसून जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष जन सामान्यांच्या मुद्द्यांना हात घालते तेव्हा तेव्हा भाजप ची ट्रोल आर्मी गांधी घराण्यावर अपप्रचार सुरू करते.




महागाई ने सम्पूर्ण देशातील जनता त्रस्त आणि संतापात असतांना जाणीव पूर्वक भाजपचे राहतोगी सारखे ट्रोलर्स असे विडिओ करून लोकांचं लक्ष मुख्य मुद्यावरून विचलित करण्याचा प्रयत्न करतात. कालच घरघुती गॅस सिलिंडर मध्ये २५ रुपयांची वाढ झाली आता सगळीकडे हिच चर्चा सुरू असतांना असे विडिओ भाजप च्या ट्रोल आर्मी कडून जाणीवपूर्वक वायरल केले जात आहे. मागच्या सात वर्षांपासून भाजप चे हेच उद्योग सुरू आहे, विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही, मीडिया गोदी मीडिया बनला आहे, तर ट्विटर सारख्या सोशल मीडियावर आवाज उठवल्या गेला तर तिथे देखील अकाउंट ब्लॉक करून दडपशाही ची वागणूक केंद्र सरकार कडून दिली जाते अशी टीका त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर केली. देशा साठी त्याग करणाऱ्या नेहरू गांधी कुटुंबातील सदस्यांचा अपमान काँग्रेस कार्यकर्ते सहन करणार नाही म्हणून च या अभिनेत्री च्या विरोधात लेखी तक्रार एसपी अरविंद साळवे यांना देण्यात आली आहे.




पुण्या मध्ये देखील या नटी च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच बरोबर आता चंद्रपूर मध्ये देखील गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती नम्रता ठेमस्कर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हा महिला काँग्रेस चहै उपाध्यक्षा सुनीता धोटे, सेवा फाउंडेशन च्या शहरध्यक्षा शीतल काटकर, जिल्हा सेवादल महिला काँग्रेस च्या अध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर अध्यक्षा लता बारापात्रे, अनुसूचित विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनु दहेगावकर, शहर अध्यक्षा शालिनी भगत, मंगला शिवरकर यांची उपस्थिती होती.

Pages