राष्ट्रीय पातळीवरील ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाल्याने पक्ष अधिक बळकट झाला, मारेगाव,वणी , झरी विभागीय बैठक३१ ऑगष्टला राष्ट्रवादीचे डॉ. महेन्द्र लोढा यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली, या बैठकीत शिक्षण सम्राट डॉ. अशोक जिवतोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र जी लोढा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भावी निवडणूकी बाबत उपस्थित वणी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेंच या बैठकीत प्रमुख उपस्थितीत असलेले नुकतेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतलेले ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तथा शिक्षण सम्राट डॉ. अशोक जिवतोडे यांनी सुध्दा पक्ष संघटन बांधणीवर भर देत मार्गदर्शन केले.
या बैठकीत राष्ट्रवादी चे वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंग गोहोकार, जिल्हा सरचिटणीस अंकुश माफुर,व आशिष मोहितकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयालक्ष्मी आगबतलवार, मारेगाव तालुका अध्यक्ष भारत मत्ते,वणी शहर अध्यक्ष राजा भाऊ बेलोरिया,मारेगाव शहर अध्यक्ष मुन्ना शेख,वणी महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले,रामकृष्ण वैध, राजू उपरकर, मारोतो मोहाडे, आशाताई टोंगे, वैशाली तायडे, सनी शर्मा आदी वणी विधान सभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.