अवैध धंदे बंद करणाऱ्या सरपंचा विरुद्धच दाखल केला गुन्हा :सागरा ग्रामपंचायत सरपंच शंकर रासेकर यांच्यावरील गुन्हे वापस घ्या - ग्रामसंवाद सरपंच संघटनेची मागणी #bhadrawati - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अवैध धंदे बंद करणाऱ्या सरपंचा विरुद्धच दाखल केला गुन्हा :सागरा ग्रामपंचायत सरपंच शंकर रासेकर यांच्यावरील गुन्हे वापस घ्या - ग्रामसंवाद सरपंच संघटनेची मागणी #bhadrawati

Share This
खबरकट्टा / भद्रावती -


चंद्रपूर भद्रावती तालुका मधिल सागरा ग्रामपंचायत येथील सरपंच शंकर रासेकर यांनी गावातील अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरु केली असता.त्यांचंवरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले सदर शेगाव पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 34.294.323 अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात होते.

ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या वतीने आज शेगाव. पोलीस निरीक्षक मेश्राम साहेब यांची भेट घेतली व सदर गुन्हा मध्ये योग चौकशी करून गुन्हे वापस घेण्या संदर्भात चर्चा झाली. यावेळी उपस्थित जेष्ठ सरपंच प्रदीप महाकुलकर. मार्गदर्शक ऍड देवा पाचभाई. जिल्हा सचिव प्रशांत कोपूला. जेष्ठ सरपंच धनराज पायघन. तालुका अध्यक्ष नयन जांभुळे.मनीषा रोडे मोहित लभाने मंगेश ननावरे रवि घोडमारे महेश क्षीरसागर.सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते.

Pages