ग्रामसंवाद सरपंच संघांचे राज्य अध्यक्ष अजिनाथ धामणे साहेब यांच्या नेतृवार विश्वास ठेवून नागभीड तालुका मधील सरपंच यांनी गावविकासासाठी एकत्रित येऊन ग्रामपंचायत आणि सरपंच यांच्या मजबूती साठी ग्रामसंवाद सरपंच संघ या संघटने सोबत काम करण्याचा निर्धार केला.
दिनांक 5/8/2021 रोजी झालेल्या बैठकी मध्ये सर्वानुमते तालुका अध्यक्ष पदी सरपंच पळसगाव (खुर्द )श्री नीरज उर्फ बालूभाऊ सिद्धमशेट्टीवार. उपाध्यक्ष सरपंच विलम सौं निरंजना बावणे. सचिव सरपंच बाळापूर श्री. प्रशांत कामडी. कोषाध्यक्ष सरपंच आलेवाही सौं योगिता सुरपाम.तर युवा सरपंच श्री छगन कोलते सरपंच किटाळी बोर. यांची जिल्हा कार्यकारणीने कामाची दखल घेऊन जिल्हाअध्यक्ष रिषभ दुपारे यांनी जिल्हाउपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली.
तर विदर्भ सरचिटणीस निलेश पुलगमकर. मार्गदर्शक ऍड देवा पाचभाई यांनी निवडीकरिता सहकार्य केले या निवडी मुळे नागभीड तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या कडून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.