गडचिरोली जिल्ह्यात ऑनलाईन जुगार खेळण्याचे रॅकेट सक्रिय असल्याच्या माहितीवरून 30जुलै रोजी गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या कारवाईत दहा आरोपीना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात काल शुक्रवारी आणखी दोन मासे अडकले आहेत. आष्टीचे माजी सरपंच राकेश बेलसरे व नागेपल्लीचे संजय दरेकर दोघेही फरार झाले आहेत.
शुक्रवारी आष्टी येथे कोट्यावधीचे ऑनलाईन जुगाराचे रॅकेट सक्रिय असल्याच्या गोपनीय माहितीवरून अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व त्यांच्या टीमने आष्टी परिसरातील छगन मठाले, राजू धर्मांडी, मनोज आडेटवार, द्रव्यराव चांदेकर, सुमित नगराळे आणि अहेरी अल्लापल्ली परिसरातील सुरेंद्र शेळके, संदीप गुडापावार यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी बोलावले होते.
चौकशीदरम्यान हे सर्व आरोपी ऑनलाईन जुगार प्लेटडफॉर्म च्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉल व इतर बाबींसंबंधि बुकी म्हणून काम करत होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या रॅकेट मध्ये चंद्रपूरातील राकेश कोंडावार, रजिक अब्दुल खान, महेश अल्लेवार हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात बेकायदेशीर ऑनलाईन सट्टा प्लॅटफॉर्मचे मुख्य वितरक असून ते युजर आयडी व पासवर्ड च्या माध्यमातून एजन्ट, क्लायंट तयार करीत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले असता ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपीवर माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणात आता जसजशी चौकशी पुढे सरकत आहे दररोज नवनवीन नावे पुढे येत आहेत. काल नव्याने आष्टीचे माजी सरपंच राकेश बेलसरे व नागेपल्लीचे संजय दरेकर दोघेही फरार झाले असून पोलीस पथक त्यांचा कसून शोध घेत आहेत.
चंद्रपुरातुन अटक झालेल्या् तीन वितरक असलेल्या आरोपी व्यतिरिक्त आणखीन दोन आरोपी फरार असून अवैध दारू व्यावसायिक असलेला बडा व्यक्ती यात सामील असल्याची शहरात चर्चा आहे. या व्यतिरिक्त काही राजकीय व्यक्ती या प्रकरणात सामील असल्याची चर्चा असून पोलिसांनी धरलेले आरोपी हे फक्त त्यांचे मोहरे आहेत तर् खरे चेहरे राजकीय आश्रयचा फायदा घेत तो मी नव्हे या भूमिकेत वावरताना दिसत असले तरीही मागील वर्षी एका तारंकित हॉटेल मध्ये झालेल्या त्या वितरक -एजंट भोज-पार्टीचीही चौकशी होणार असल्याचे कळते. असे झाल्यास त्या भोज पार्टीचे राजकीय नेते आसलेले आयोजक अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कळवनिया यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, नापोशी मनोज कुणघाडकर, पोलीस शिपाई विश्वनाथ उडान, वाजडू दहिफळे, श्रीकांत भांडे, नितीन पाल, सुरज करपते, उद्धव पवार, बेगला दुर्गे यांनी केली.