:- सविस्तर वृत्त असे की राजुरा तालुक्यातील पोवनी २ खदान, साखरी येथील MEC & CMPL Joint venture या नावाने काम करत असलेली (चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनी) ही कंपनी कॅम्प मधील (परप्रांतीय) कामगार दिनांक १/८/२१ ते ३१/८/२१ काम करतील पण पगार मात्र त्यांना १५ दिवसांचाच मिळेल. आणि स्थानिक कामगार या महिन्यांमध्ये काम करणार नाहीत, तरी त्यांना देखील १५ दिवसांचा पगार मिळेल. आणि पुढील महिना म्हणजे दिनांक:- १/०९/२१ ते ३०/०९/२०२१ स्थानिक कामगार काम करतील पण पगार मात्र १५ दिवसांचा घेतील. व कॅम्प मध्ये राहणारे (परप्रांतीय) कामगार यांना संपूर्ण महिना सुट्टी असेल व काम न करता पगार १५ दिवसांचा घेतील. असा निर्णय कंपनीचे प्रशासक (कंत्राटदार) मोहित चड्डा यांनी दिनांक:- ३/०८/२०२१ रोजी घेतला.
अशा प्रकारचा बेकायदेशीर निर्णय घेऊन कंपनी (एक महिन्याचा पगार दोन महिन्यांमध्ये विभागून कारण नसताना जबरदस्ती सुट्टी देऊन जाणीवपूर्वक कंपनी कामगारांना एक महिना घरी बसवून त्यांच्या पोटावर लाथ मारत १०३०/- प्रति दीन रोजी चे नुकसान करीत आहे. आणि हे सगळे बेकायदेशीर निर्णय पावसाळा लक्षात घेऊन करण्यात येत आहे.जणू काही इंद्र देव आले आणि या मोहित चड्डा ला सांगून गेले की मी १५ दिवस वर्षा करेल हास्यास्पद आहे !!!!! व असा निर्णय घेणारा मोहित चड्डा मानसिक दृष्टी ने बरा आहे काय??? हा सवाल आपसूकच आपल्या मनाला पडण्यासारखा आहे. आणि ही कंपनी अश्याच प्रकारच्या कामगारविरोधी निर्णयाने सतत वादात असते हे देखील उल्लेखनीय आहे.
महत्त्वाचे म्हणजेच कंपनी/कंत्राटदार ठेका घेतांना काम मिळण्याकरिता स्पर्धेत कमी शुल्क आकारून ठेका घेतात. आणि त्यानंतर जर त्या ठेक्यामध्ये नुकसान होत असेल तर मग ती नुकसान भरपाई करण्याकरिता कंपनी जाणीवपूर्वक कामगार संरक्षण कायद्याचे सर्रासपणे अश्या प्रकारचे हिटलरी फर्मान काढून कायद्याचे उल्लंघन करून कामगारांच्या पोटावर लाथ मारून कामगारांची पिळवणूक करते. "या सर्व बाबींचा कंपनी टेंडर घेतांनाच विचार का बर करत नाही? असा प्रश्न कामगारांना उद्भवला आहे.
या कंपनीतील स्थानिक कामगार कंपनी मध्ये जेवण करत नसून व कंपनी मध्ये राहत नसून देखील कंपनी जबरदस्तीने कामगारांचे राहण्याचे पैसे तथा मेस च्या नावाने अंदाजे २०५/- रुपये प्रतिदिन प्रमाणे पैसे कपात करीत आहे . तथा ह्या कंपनीमध्ये शासनाने ठरविलेल्या व्हेज-बोर्ड नुसार वेतन दिले जात नाही, तसेच पी एफ, पेमेंट स्लीप व ओव्हर टाइम मिळत नाही. याशिवाय विविध कारणाने कामगारांची पिळवणूक करून केंद्र शासनाच्या कामगार कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन कंपनी कडून सातत्याने करण्यात येत असल्याबाबत ची तक्रार दिनांक २७/०५/२०२१ रोजी जय भवानी कामगार संघटनेतर्फे संबंधित विभागांमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय श्रम आयुक्तांनी या कंपनी प्रशासनाला कामगार संरक्षण कायद्याचे पालन करण्यास सांगितले असताना देखील मोहित चड्डा यांनी आयुक्तांच्या आदेशाची अवहेलना करत देशातील घटनेला व कायद्याना तिलांजली देऊन हा चड्डा कंपनीचा मालक मोहित चड्डा अरेरावी करतो आहे. व कामगारांवर हुकूमशाही लादत त्यांची जाणीवपूर्वक पिळवणूक करून कामगारांना मोठ्या अभिमानाने सांगतो की मी कामगार आयुक्त यांना २ लाख रुपये महिन्याने विकत घेतले आहे,तुम्ही तक्रार केल्यास देखील माझे काही होणार नाही.
या मानसिक रोगी? हिटलर चे असे फर्मान मानण्यास जय भवानी कामगार संघटने ने नकार दिला असून चंद्रपूर जिल्ह्यातील हुकूमशाही करणारा भारतीय इंग्रज मोहित चड्डा यांच्या कामगार विरोधी निर्णयाला बडलण्या करीता कंपनीतील कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात दिनांक- ३/०८/२०२१ रोजी काम बंद आंदोलन केले. कंपनी प्रशासनाने तात्काळ कामगारांच्या बाजूने निर्णय न घेतल्यास संस्थापक अध्यक्ष ठाकरे यांनी कामगारांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कंपनी ला दिला आहे.