RPF च्या कोठडीत आरोपीचा मृत्यू ⭕ बल्लारपुर आरपीएफ रेल्वे मधिल रेल्वे घटना ⭕ घातपात कि हत्या; उच्चस्तरीय चौकशीची मागणी - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



RPF च्या कोठडीत आरोपीचा मृत्यू ⭕ बल्लारपुर आरपीएफ रेल्वे मधिल रेल्वे घटना ⭕ घातपात कि हत्या; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपुर (प्रतिनिधी) : 13 जुलै 2021

चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका आरोपीचा आरपीएफच्या पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज मंगळवारी (13जुलै) ला उघडकीस आली आहे. अनिल गणपत मडावी (वय 29) असे मृत आरोपीचे नाव आहे. कुटुंबियांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

विरुर पोलीस ठाण्या हद्दीत चोरीच्या आरोपाखाली आरोपी अनिल गणपत मडावी याला अटक करण्यात आली होती. काल सोमवार’ला साऊथ आरपीएफ चौकीत आणण्यात आले होते. हाताला दुखापत झाल्याचे कारण देत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री दहा च्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान या आरोपीचा मृत्यू झाला. दिवसभर या घटनेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली.


मात्र, मंगळवार दि.१३ रोजी दुपारनंतर या घटनेची माहिती बाहेर आली. घटनेचं नेमकं कारण काय?याबाबत चर्चेला उधाण आले असून, हा घातपात तर नाही नं असा संशय व्यक्त करीत कुटुंबीयांनी उचस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

Pages