हेल्पिंग हॅन्ड महीला सेवा भावी संस्थेकडून गरजु विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वितरण #helping-hands - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



हेल्पिंग हॅन्ड महीला सेवा भावी संस्थेकडून गरजु विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वितरण #helping-hands

Share This
खबरकट्टा / राजुरा 13 जुलै

विद्येसारख पवित्र ज्ञान ह्या जगात नाही ते सार्थ करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पाठ्यपुस्तक ह्या पाठ्यपुस्तकाचे वितरण हेल्पीग हॅन्डच्या सेवा भावी संस्थेकडून संकटमोचन हनुमान मंदीर प्रागंणात करण्यात आले. ह्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लता चांडक तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक बी यु. बोर्डेवार, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले, संकट मोचन हनुमान मंदिर चे पंडित राधेय व भानुप्रसाद यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


ह्या कार्यक्रमात शिवाजी हायस्कुल शाळा,आर्दश हायस्कुल शाळा तथा जीजामाता शाळाचे ऐकुन २० गरजू विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके वाटप करण्यात आली. यात इयत्ता ९ व १० वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन रजनी शर्मा यांनी केले.



प्रास्तावीक कृतिका सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिता जमदाडे यांनी केले ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमृता धोटे,कंचन चांडक,रमा आईटलावार,स्वरूपा झंवर,वर्षा झंवर, रचना नावंदर, भावना रागीट, स्नेहा सायंकार, रेखा बोंडे,आशा चांडक,स्नेहा चांडक,सीमा कलसे,वज्रमाला बतकमवार ह्यांचा उस्फुर्त सहभाग लाभला.

Pages