चंद्रपूर शहरातील गोरगरीब व सामान्य नागरिकां कडून महानगरपालिका तर्फे टॅक्स वसूल केल्या जाते परंतु थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपुर चे 8 व 9 नंबर चे 500 मेगावॅट युनिट चे 2 संच चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत येत असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे टॅक्स वसूल केले जात नाही.
यासंदर्भात आज महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांना निवेदन देण्यात आले व तात्काळ या वर उचित कार्यवाही करून टॅक्स वसूल करण्यात यावे व झोपी गेलेल्या महानगरपालिकेतील भाजपा सत्तेचे डोळे उघडण्या करिता महापौरांच्या दालनात ढोल बजाओ आंदोलन करण्यात येईल. या प्रसंगी माजी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष नंदू नागरकर नगरसेविका सुनीता लोढिया नगरसेवक अशोक नागापुरे नगरसेवक देवेंद्र बेले व नगरसेवक निलेश खोब्रागडे उपस्थित होते.

