वनहक्काचा दावा मिळाल्याने ग्रामस्थांची जबाबदारी वाढली : आमदार प्रतिभाताई धानोरकर चोरा गावाला १९५९ एकर जागेचा सामूहिक वनहक्क : इतर गावांसाठीही प्रयत्न करणार #pratibha-dhanorkar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



वनहक्काचा दावा मिळाल्याने ग्रामस्थांची जबाबदारी वाढली : आमदार प्रतिभाताई धानोरकर चोरा गावाला १९५९ एकर जागेचा सामूहिक वनहक्क : इतर गावांसाठीही प्रयत्न करणार #pratibha-dhanorkar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

वनहक्काचा दावा मिळाल्यामुळे ग्रामस्थांची जबाबदारी वाढली आहे. वनोपजातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते ग्रामस्थ आत्मनिर्भर होणार असून वनाचे संरक्षण, देखरेख, नियोजन करावे लागणार आहे. भद्रावती तालुक्यात वनपक्काचा सर्वात मोठा दावा मिळविलेले चोरा गाव ठरले असून यानंतर तालुक्यातील इतर गावांना वनहक्काचा दावा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.

चोरा येथे आयोजित वनहक्काचा दावा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी भद्रावतीचे तहसीलदार तहसीलदार महेश शितोडे, पर्यावरम मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते माधव जिवतोडे, ग्रामसेवक, वनअधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याचवेळी वायगाव रिठ या गावातील नागरिकांना वनहकक्दावा प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

भद्रावती तालुक्यातील चोरा ग्रामसभेला वनहक्क कायद्यांतर्गत १ हजार ९५९ हेक्टरचा सामूहिक वनहक्काचा दावा मिळाला आहे. त्यामुळे आता ग्रामस्थ या वनावर आपले हक्क प्रस्थापित करणार असून, देखरेख, नियोजन, संरक्षण करणार आहे. या वनापासून मिळणाऱ्या उत्पन्नावरही ग्रामस्थांचा हक्क राहणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांची जबाबदारी वाढल्याचे सांगून तालुक्यातील प्रलंबित इतर वनहक्क दावे आपण स्वत: लक्ष देवून निकाली काढू, असे आश्वासनही आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले.

Pages