जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा स्थानिक स्तरावर तातडीच्या उपाययोजना कराव्यात #dio - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा स्थानिक स्तरावर तातडीच्या उपाययोजना कराव्यात #dio

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात झालेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी वायाळ, पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक उपायुक्त अमोल यावलीकर आदी उपस्थित होते.


यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता उपविभागीय तथा तालुकास्तरावर गठीत समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात. शहरी तसेच ग्रामीण भागात गाव, रस्ते, मोहल्ला आदी ठिकाणांना जातीवाचक नाव असेल तर ते बदलविण्याकरीता ठराव घेऊन प्रस्ताव सादर करावा. अशा ठिकाणी पर्यायी नावांचे फलक लावल्यास बोलीभाषेत जातीवाचक नावांचा उल्लेख होणार नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिका-यांनी त्वरीत कार्यवाही करावी. सध्या पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर तातडीच्या उपाययोजना कराव्यात. तसेच संपूर्ण यंत्रणेने अलर्ट राहावे. कोणीही मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.


यावेळी जून २०२१ पर्यंतच्या माहितीचा आढावा, अत्याचारग्रस्तांना आर्थिक सहाय्य मंजूर प्रकरणे, ॲक्ट्रोसिटी कायद्यांतर्गत पोलिस तपासावर प्रलंबित तसेच न्यायालयात प्रलंबित गुन्ह्यांची प्रकरणे, अत्याचारग्रस्त व्यक्तिंना जात प्रमाणपत्राचे वाटप, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना, हाताने मैला उचलणा-या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समिती स्थापन करणे आदींचा आढावा घेण्यात आला.

Pages