अंबुजा फौंडेशन उपरवाही यांच्या संयुक्त विद्यमाने कोरपना तालुक्यातील इरई येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण संपन्न #covid-vacccin - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अंबुजा फौंडेशन उपरवाही यांच्या संयुक्त विद्यमाने कोरपना तालुक्यातील इरई येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण संपन्न #covid-vacccin

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : कोरपना -राहुल पायघन (इरई )

आज दि. २१/०७/२०२१ रोज बुधवार ला इरई येथे कोरोना लसीकरण कॅम्प आयोजित केला, इरई सारख्या छोट्या गावात लसीकरण कॅम्प घेत प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा व अंबुजा फौंडेशन उपरवाही यांनी पुढाकार घेऊन दोन दिवस अगोदर गावकऱ्यांशी कोरोना लसीकरनाबाबत चर्चा केली.

गावातील नागरिकांनी लसीकरण करण्याची इच्छा दर्शवली त्या अनुषंगाने आज दि.२१/०७/२०२१ ला इरई येथे लसीकरण करण्याचे ठरविले व गावातील जनतेनी याला प्रतिसाद दिला.110 लोकांनी लसीकरण केलं.

यावेळी श्री बावणे सर(वैद्यकीय आरोग्य अधिकारी) कु. कोरडे (सी. एच. ओ.) कु. गादम (आरोग्य सेविका) सौ. ताजने(आशा सुपरवायझर) सौ. आत्राम(आशा ) कु. सुचिता खडसे(अंबुजा फौंडेशन) श्री हरिश्चंद्र बोढे(अंबुजा फौंडेशन) श्री गज्जलवर (अंबुजा फौंडेशन ) यांनी यावेळी आपले कर्तव्य बजावले व गावातील जनतेनी याना सहकार्य केले.


Pages