
⭕️ रामू तिवारी आणि नंदू नागरकर यांची शाब्दिक फ्री स्टाईल पोहचली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दरबारी.
खबरकट्टा / चंद्रपूर : 21जुलै : राजकीय विशेष -गोमती पाचभाई
कालपासून चंद्रपूर शहरातील राजकिय वर्तुळात एकच चर्चा होती. ती म्हणजे माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर आणि आजी अध्यक्ष रामू तिवारी यांच्यातील राजकीय हाणामारी ची. हा वाद बराच विकोपाला गेल्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला पण मुळात या मागची सर्व इनसाईडस्टोरी खबरकट्टा च्या हाती लागली आहे.
मागच्याही वेळेला जेव्हा टीम खबरकट्टा ने तिवारी यांचा वर्षभराचा लेखाजोखा मांडला आणि त्यांच्या निष्क्रियतेची कहानी वाचकांना दिली त्यावेळी देखील रामू तिवारी धावत पळत कसे बसे दम टाकत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे आपला अहवाल घेऊन पोहचले होते, त्याच प्रमाणे यावेळी जेव्हा त्यांच्या चेले चपट्यानी गुंड प्रवृत्ती दाखवली त्याची कहाणी रात्रीच टीम खबरकट्टा ने वाचकांना दिली होती आणि योगायोगाची गोष्ट अशी आज देखील पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी अहवाल सादर केला.
आता एकच व्यक्ती,एकाच व्यक्तीला दोनदा अहवाल का सादर करते.?? कारण एकच स्वतःच अस्तित्व नष्ट होण्याची भीती. ज्या पद्धतीने रामू तिवारी यांची वाटचाल सुरू आहे त्या पद्धतीने आगामी निवडणुकीत रामू तिवारी यांच्या समर्थकांचे तर सोडा पण खुद्द तिवारी यांना तरी तिकीट मिळेल का? अशी शंका आता काँग्रेस च्या वर्तुळात दबक्या आवाजात सूरु झाली आहे त्यामुळे ज्या लोकांना रामू तिवारी यांनी नगरसेवक बनवतो म्हणून स्वप्न दाखवली त्या लोकांना आता आपल्याला तिकीट तरी मिळते की नाही या विचाराने झोप येत नाहीयेय. ना संघटन कौशल्य, ना भाषा ना शिक्षण, ना लोकांशी जुळण्याची कला तरिही रामू तिवारी अध्यक्ष बनले पण आता ज्यांनी बनवलं तेच नेते खाजगीत बोलू लागले आहेत की आपली निवड चुकली.
आता हे सर्व जाऊ द्या वाचकांना प्रश्न पडला असेल, की मिटिंग मध्ये नेमकं काय झालं?? तर ते आता थोडक्यात. ही मिटिंग पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ठेवली होती, यात जे पदाधिकारी आहेत त्या अनेकांनी शहर अध्यक्षा नी निरोप दिले नाहीत पण जे पदाधिकारी नाहीत किंवा काँग्रेस चे कार्यकर्ते नाही त्याना मात्र आवर्जून फोन तिवारी यांना केले केवळ नगरसेवक आणि पदाधिकारी यांना निमंत्रण असताना देखील तिवारी यांनी पाल्लाळ लोकांना निरोप दिले.
जणूकाही पालकमंत्री यांची मिटिंग होऊ च नये अशी मनीषा तिवारी यांची होती.(तसे पण तिवारी हे बाळू धानोरकर गटाचे मानले जातात त्यामुळे जाणीवपूर्वक वाद घालून त्यांनी ही मिटिंग उधळली का? हा पण विचार करण्यासारखा प्रश्न आहे) असो आता ज्या हॉल मध्ये ही मिटिंग सुरू होती तिथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आले तर नगरसेवक नंदू नागरकर यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना विनंती केली की नगरसवेकांचे म्हणणे खासगीत ऐका पालकमंत्री यांनी आधी या गोष्टीला नकार दिला पण नंतर पालकमंत्री दुसऱ्या कक्षात नगरसेवकां सोबत गेले. आणि खनिज विकास निधीतून नगरसेवकांना ५० लाख तर हरलेल्याना २५ लाख असे निधी वाटप ठरले.
रामू तिवारी यांनी हरलेल्याची यादी पालकमंत्री यांना सादर केली. पण यात अनेक जे लोक काँग्रेस मधून मागील निवडणुकीतून थोड्याच फरकाने हरले होते त्यांची नावे नव्हती जसे की " शालिनी भगत "ज्या फक्त ३६ मतांनी हरल्या या उलट जे लोक अपक्ष लढले, जे लोक म्हणजे स्वतः तिवारी ( एका रात्रीतून भाजप मध्ये पळाले) आणि जे लोक मागील निवडणुकीत उभेच नव्हते त्या लोकांची नावे रामू तिवारी यांनी पालकमंत्री यांना दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार ३० लोकांना तिकीट देतो हे आश्वासन तिवारी यांनी दिले आहेत, त्यामुळे त्यांना फुकटचा निधी कसा मिळेल?? याची काळजी तिवारी घेत होते त्यावर माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांनी आक्षेप घेतला तेव्हा पप्पू सिद्दीकी नामक अत्यंत मूर्ख माणसाने तिवारी यांना इशारा कररून 'आज इस्को मैं यही धोता' असे वाक्य उच्चरले त्यावर नागरकर यांनी देखील मग आवाज वाढवून प्रतिकार केला. मुळात हा सिद्दीकी ना पदाधिकारी ना माजी नगरसेवक ना आजी नगरसेवक मग हा आता खाजगी मिटिंग मध्ये गेला तरी कसा?? म्हणजे असे गुंड लोक रामू तिवारी सोबत ठेवतात हेच यांचे संघटन आहे का?? बाकी सर्व पदाधिकारी दुसऱ्या कक्षात वाट बघत असतांना केवळ आपले चेले चपाटे घेऊन तिवारी पालकमंत्री समोर उपस्थित होते.
त्याहीपार त्यांचा माजी महापौर संगीता अमृतकर ज्या एनवेळी काँग्रेस ची साथ सोडून 11नागतसेवकांना सोबत घेऊन गेल्या अश्या पक्ष-द्रोहिंना सुद्धा निधी द्यावा असा तिवारीचा कल होता. या संदर्भात लोकसत्ता ने 21 जुलै च्या सदरात सविस्तर वृत दिले आहे.
पक्षात अनेक गोष्टी खासगीत चालतात पण तिवारी यांना पक्षाचे नियम माहीत नाही म्हणून ते असे लोक घेऊन मिटिंग ला आले का?? असाही सवाल उपस्थित झाला. दोन्ही आजी माजी नगरसेवक एकमेकांना धमकावू लागल्याने पक्षाच्या शिस्तीचा बोजवारा उडाला.
पालकमंत्री अतिशय उद्विग्न झाले, ठरलेली मिटींन सुद्धा रद्द झाली त्यामुळे इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. पालकमंत्री अतिशय संतापलेले बघून तिवारी यांच्या पायाखालची वाळू पुन्हा सरकली व त्यांनी पालकमंत्री यांना विनवण्या करून आषाढी एकादशीची खिचडी खायला ऑफिसमध्ये बोलवून घेतले. पालकमंत्री यांनी नाश्ता आणि चहाशिवाय एकही शब्द बोलले नाही कारण अपक्ष आमदार जोरगेवार देखील सोबत होते. ( जोरगेवार यांच्याशी सुद्धा रामू तिवारी यांचे सौख्य नाही त्यांनी अनेकदा जोरगेवार यांच्या विरोधी पोस्ट फेसबुकवर टाकल्या आहेत, आणि तिवारी ज्या वॉर्डातून संभाव्य उमेदवार होणार त्या वॉर्डात जोरगेवार यांचे घर आहे याचा अर्थ समजून घ्या) तर कालच्या झालेल्या सम्पूर्ण तामशावरून पालकमंत्री यांचे मन वळवण्यासाठी आणि ड्रमेज कंट्रोल साठी तिवारी यांनी पालकमंत्री यांना ऑफिसमध्ये आमंत्रित केले.
कोणत्याही राजकीय परिस्थितीवर पालकमंत्री यांनी भाष्य केले नाही तरीही शहर काँग्रेस चे काम उत्तम सुरू आहे असे पालकमंत्री म्हणाले, राजकीय चर्चा पालकमंत्री यांनी केली, कामाची दखल घेतली अशा पद्धतीच्या पोस्ट रामू तिवारी आणि त्यांच्या चेले चपट्यानी दिवसभर फिरवली पण पालकमंत्री यांनी अशी कुठलीही दाद शहर काँग्रेस दिलेलीच नाही.
ते म्हणतात ना दूध पिणाऱ्या मांजरीला वाटत असत की तिला कोणी बघत नाहीयेय तशीच अवस्था तिवारी यांची झालेली आहे. एका वर्षातील निष्क्रियता, सतत रुसणे फुगणे, लोकांना शिवीगाळ करणे ( त्यात पालकमंत्री व खासदार पण आहेत) हेच यांचे पक्ष संघटन आहे आणि हीच यांची पक्षशिस्त आहे. त्यामुळे निवडणूक समोर असतांना या आजी माजी शहराध्यक्षा मुळे सर्व पदाधिकारी पण त्रासले आहेत. आता हाती आलेल्या माहिती नुसार हे प्रकरण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पर्यंत गेले असून निरीक्षक देखील या साठी पाटोले पाठवू शकतात ही माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला प्राप्त झाली आहे.


