उपजिल्हा रुग्णालयात न्यूमोनिया लस उपलब्ध पालकांनी बालकाना लस देऊन संरक्षित करावे : डॉ . एल. टी. कुळमेथे #pneumonia - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



उपजिल्हा रुग्णालयात न्यूमोनिया लस उपलब्ध पालकांनी बालकाना लस देऊन संरक्षित करावे : डॉ . एल. टी. कुळमेथे #pneumonia

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

राजुरा उपजिल्हा रुग्णालयात निमोनिया लसीकरणाची सुरुवात झाली असून दीड महिन्यावरील बालकांना हि लस घेता येईल करिता तालुक्यातील नागरिकांनी आपल्या बाळांना या लसीचे डोज देऊन संरक्षित करावे असे आव्हान रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . एल. टी. कुळमेथे यांनी दि .१७ रोजी झालेल्या लसीकरण मार्गदर्शन उदघाटन प्रसंगी केले आहे.

छोट्या बालकांना श्वसनाचे आजार होऊ नये म्हणून cpv देण्यात येते नवजात बालके ( दीड महिना ) याना हि लस दिल्यास त्याचे निमोनिया या आजारापासून संरक्षण होते . निमोनिया हा श्वसन प्रक्रियेत होणार आजार आहे त्यामुळे बालक संक्रमित झाल्यास बालक दगावू शकते त्यामुळे बालकांना संरक्षित करण्याचे दृष्टीने CPV लस राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच उपलब्ध झाली असल्याचे डॉ . एल. टी. कुळमेथे यांनी उपस्थित बालकांच्या मातापित्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

या pcv निमोनिया लसीकरण मार्गदर्शन कार्यक्रमासाठी चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ . उमाकांत धोटे वैद्यकीय अधिकारी डॉ . ए . डी. अरके , मॅडम डॉ . आर . ए . यादव , डॉ . गायकवाड मॅडम डॉ . अमित चिदंमवार , डॉ . सुरेंद्र डुकरे , श्री . डी . एम वाघ , मनोज एन ताजने परीसेवीका महुआ चौधरी , लता धानोरकर , भारती रामटेके हे प्रामुख्याने उपस्थिती होते.

Pages