दि. 19/07/2021 वार रविवारी ग्रामसंवाद सरपंच (संघ) संघटना अल्पावधीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली या अनुषंगाने आज प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली बैठकीसाठी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून सुद्धा महिला सरपंच यांनी भाग घेतला महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकाऱ्यांनी बैठकीसाठी हजेरी लावली या बैठकीमध्ये ग्रामीण विकासावर व भविष्यात महाराष्ट्र राज्यात दौरे व जिल्हास्तरावरिल बैठका यासंदर्भात चर्चा करण्यात आली याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री अजिनाथ धामणे पाटील यांनी गाव विकासासाठी एक विकास आराखडा तयार केला आहे.
या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक सरपंचापर्यंत या विकास आराखड्यानुसार गावाचा शाश्वत विकास करण्याचा संघटनेचा मानस आहे असे श्री अजिनाथ धामणे पाटिल यांनी सांगितल याप्रसंगी संघटनेबद्दल व सदस्य नोंदणी बद्दल प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रमोद भगत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तर प्रदेश सचिव विशाल लांडगे यांनी प्रस्तावना केली महिला प्रदेशाध्यक्ष कल्याणीताई राजस यांनी महिलांचा राजकीय प्रवास या विषयावर मार्गदर्शन केले.
गाव विकास कसा करायचा यासंदर्भात राज्य प्रवक्ता श्री भाऊसाहेब काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले या मीटिंगसाठी मराठवाडा विभाग प्रमुख श्री किरण घोंगडे ,हिंगोली जिल्हा अध्यक्ष अतुल घुगे ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश अहिरे पाटील विदर्भ विभाग अध्यक्ष दिगंबर धानोरकर शिव शंकर काळे,गंगा धांडरे ,अजित सिंग राजपूत निलेश पुलगमकर ,मलारेड्डी यालनवारतीश पवार, मोहन पाटील ,राहुल धामणे ,राहुल बोडके ,निखिल धामणे ,अनिल भालेराव ,सविता आहाके ,गंगाताई ताठे , यांच्यासह गडचिरोली जिल्हातुन प्रदेश सदस्य नंदाताई कुळसंगे विदर्भ अध्यक्ष दिगम्बर धानोरकर. सरपंच बेबीताई बुरांडे चंद्रपूर जिल्हातुन विदर्भ सरचिटणीस निलेश पूलगमकर. मार्गदर्शक ऍड देवा पाचभाई. सरपंच प्रतिभा मांडवकर व इतरही जिल्ह्याततुन अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

