सामाजिक माणसाचा सामाजिक उपक्रम ओम पवार अपघातग्रस्त युवकाच्या मदतीला धावले #om-pawar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सामाजिक माणसाचा सामाजिक उपक्रम ओम पवार अपघातग्रस्त युवकाच्या मदतीला धावले #om-pawar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - राजुरा -

गडचांदूर मार्गावर एका दुचाकीस्वार युवकाला बैलांनी धडक दिल्याने गंभीररीत्या जखमी झाला. परंतु त्याच्या मदतीला कुणी येत नसल्याचे बघून रस्त्यावरून जात असताना भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा सचिव ओम पवार यांनी माणुसकीचा परिचय देत आपल्या स्वतःच्या वाहनाने स्वतः नेऊनराजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.ही घटना सोमवारला दुपारी 1 चा सुमारास घडली.

ओम पवार हे खाजगी काम निमित्त चंद्रपूर येथे जात असताना. त्यांना राजुरा गडचांदूर मार्गावरील कापनगाव गावाजवळ रस्त्यावर संतोष जाधव नामक इसम रा. जिवती हा दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी अवस्थेत निदर्शनात आला. अनेक वाटसरु बघ्याची भुमिका घेत रस्त्यावरून पाहून जात होते. मात्र मदतीचा हात कुणीही देत नव्हते.

अशा परिस्थितीत तातडीने ओम पवार यांनी त्याला आपल्या वाहनात घेऊन राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर इजा पोहचली. मात्र वेळेवर उपचार झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यानंतर ओम पवार यांनी त्यांच्या कुटुंबाला अपघाताची माहिती देऊन त्यांच्या स्वाधीन केले. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.

मात्र त्यांच्या या मदतीमुळे अपघातग्रस्त युवकाला त्वरित मदत मिळू शकली. त्यातून माणुसकीचा प्रत्यय ही याप्रसंगातून आला.

Pages