चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर येथील वॉर्ड क्र.3 रहिवासी मारोती लष्कर यांच्या घरी जनरेटर गॅस च्या गळतीने एकाच कुटुंबातील सहा सदस्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे.
आज सकाळी दुर्गापूर परिसरातील वीज गेल्याने जनरेटर सूरू करून हे कुटुंब झोपले होते. त्यादरम्यान गॅस गळती होऊन ही घटना घडल्याचे शेजाऱ्यांना निदर्शनास आले.त्यानंतर सर्व कुटुंबियांना डॉ. झाडें हॉस्पिटल ला तात्काळ भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी 6 जणांना मृत घोषित केले.मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे.7व्या सदस्यावर उपचार सूरू आहेत.
घटनास्थळी दुर्गापूर पोलिसांची चमू दाखल झाली असून सविस्तर वृत थोड्याच वेळात......

