एक वर्षाआधी चंद्रपूरात कोणालाच नम्रता आचार्य ठेमस्कर हे नाव माहिती नव्हत,पण आज ते राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे. याच कारण म्हणजे तिचे काम साधारण सहा महिन्या आधी तिची नियुक्ती महिला काँग्रेस च्या सचिवपदी झाली. तिला महिला काँग्रेस चे सचिव पद मिळाले आणि नंतर तिने मागे वळून बघितले च नाही, ती लढत राहिली आणि लढत आहे काँग्रेस पक्षासाठी.
चंद्रपूरचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार आणि खासदार बाळू भाऊ धानोरकर तिच्या घरी गेले आणि तिला काँग्रेस पक्षात काम करा अशी सूचना केली दोन्ही वरीष्ठ नेते तिच्या घरी गेले कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती मोठ्या कौशल्याने काँग्रेस पक्षाची भूमिका मांडत होती आणि त्याची दखल पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खा. बाळू धानोरकर यांनी घेतली होती त्यातूनच तिला सरळ प्रदेश सचिव हे पद मिळाले.
जी संधी तिला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली त्याचे ती देखील सोने करून दाखवत आहे. महिला काँग्रेस ला एक नवी संजीवनी नम्रता च्या रूपाने मिळाली काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट असतांना देखील नम्रता आज पण सांगते काँग्रेस हाच पक्ष काम करण्यासाठी सर्वात उत्तम आहे कारण काँग्रेस हा पक्ष नसून विचारधारा आहे, म्हणून मी काँग्रेस पक्षाची सेवक आहे असे ती नम्रपणे सांगते.
माझी नम्रता शी ओळख मी कॉलेजमध्ये असतांना पासून ची आहे. तेव्हा पण ती अशीच धडाकेबाज होती वादविवाद स्पर्धेचे अनेक बक्षीस तिच्या नावावर होते आज पण तीच वक्तृत्व अमोघ आहे सोबत योग्यपणे ती मुद्दे मांडते त्या साठी ती अभ्यास देखील खूप करते. तिने मराठीत एम.ए. केले आहे त्यामुळे साहित्याची आवड देखील तिला खुप आहे, तिला कविता करता येतात, लिहिता येते भाजपच्या विरोधातील तिचे किती तरी लेख तिच्या फेसबुकवर आहेत. राज्यशात्र या दुसऱ्या विषयात तिने एम.ए.केले आहे. एम.एड.सुद्धा तिचे झाले असून जर्नालिसम मध्ये तिला विद्यापीठातून सुवर्ण पदक आहे. काही वर्षे तिने पत्रकार म्हणून देखील काम केले आहे त्यामुळे तिला मीडिया ची जाण आहे याचा फायदा तिला आता काँग्रेसचे काम करतांना होत आहे.
भाजपच्या विरोधातील अनेक विडिओ फेसबुक लाइव्ह तिने केले आहेत. ज्या दिवशी पासून तिला नियुक्तीचे पत्र मिळाले त्या दिवशी पासून तिने महिला काँग्रेस चे काम सुरू केले. आंदोलन केले, निदर्शने केले, सिलिंडर घेऊन रस्त्यावर बसली, इतकी नारेबाजी केली की लोक बघतच राहतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तिने ' मदतीचा एक घास' हा उपक्रम २६ दिवस निरंतर राबवून शासकिय रुगणालायतील गरजूंना जेवण पुरवले. एक टीम तिने तयार केली आणि सगळे हॉटेल्स, उपहारगृह बंद असतांना हा उपक्रम तिने राबवला.या उपक्रमाला जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी भेट दिली त्याच बरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष नाना पटोले जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी देखील या उपक्रमाला भेट देऊन तिचे खूप कौतुक केले. नाना पाटोलें नी महिला काँग्रेस च्या उपक्रमाला भेट द्यावी म्हणून ती सकाळी साडेसहा वाजता हिराई रेस्ट हाऊस ला गेली आणि पाटोलें च्या रूम बाहेर उभी राहिली आणि त्यांना निमंत्रित करून घेऊन आली इतकी जिद्द आणि चिकाटी तिच्यात आहे.
निडरता, धाडसीवृत्ती हा तिचा मूळ गाभा आहे त्यात आक्रमक शैली जी आज काँग्रेस साठी अतिशय आवश्यक आहे ती तिच्याकडे आहे. तिचे काम सातत्याने सुरू आहे, मागच्या आठवड्यात तिने जिल्हा सामान्य रुग्णालयात मदत व सल्ला केंद्र सुरू केले त्या माध्यमातून अनेक शासकिय योजनांची माहिती रुग्णांना देता येईल अस ती सांगते.आज देखील तिने महागाई विरोधात 'आभार आंदोलन' केले. कोणते उपक्रम भविषयात देखील राबवायचे आहे याचे सगळे नियोजन तिच्याकडे आता देखील आहे.आज तिचा वाढदिवस आहे म्हणून हे सगळं लिहावंसं वाटलं तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी खुप खूप शुभेच्छा!!

