चंद्रपुरात तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोन युवकांस अटक : हातात तलवार घेऊन दमदाटी करीत होते दहशत पसरवत #crime-chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपुरात तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोन युवकांस अटक : हातात तलवार घेऊन दमदाटी करीत होते दहशत पसरवत #crime-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


येथील एसटी वर्कशॉप चौकात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपींकडून तलवार व दुचाकी जप्त केली आहे. शाहरूख नूरखान पठाण (२३) रा. खत्री कॉलेजजवळ तुकूम, साहिल इस्माईल शेख (२०) रा. सुमित्रानगर तुकूम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गुरुवारी दुपारच्या सुमारास दोन युवक दुचाकीने हातात तलवार घेऊन दमदाटी करीत दहशत पसरवत होते. याबाबतची माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू यांना मिळाली. त्यांनी एसटी वर्कशॉप चौकात जाऊन चौकशी केली असता दोघेजण तलवार घेऊन दहशत पसरवत असल्याचे आढळून आले. दोघांनाही अटक करून तलवार व दुचाकी जप्त केली. त्यांच्यावर आर्म ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू करीत आहेत.

Pages