पाच ऑगस्ट रोजी मनपाच्या झोन सभापतींची निवड #mncchandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पाच ऑगस्ट रोजी मनपाच्या झोन सभापतींची निवड #mncchandrapur

Share This
खबटकट्टा / चंद्रपूर, ता. ३० :


चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या झोन क्रमांक एक, दोन आणि तीनच्या सभापतीपदासाठी येत्या पाच ऑगस्ट रोजी निवड होत आहे. मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९ अ-(४) अन्वये विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर चे पत्र क्रमांक एमयुएन/१९/(२) कावि- २०५/२०२१ दि. २६ जुलै २०२१ अन्वये २०२१-२२ साठी चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या प्रभाग समिती क्रमांक एक, दोन आणि तीन मधील सदस्यांतून प्रभाग समिती सभापती यांची निवड करण्यासाठी ऑनलाईन विशेष सभा ता. ५ ऑगस्ट रोजी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

प्रभाग समिती एकसाठी सकाळी ११ वाजता, प्रभाग समिती दोनसाठी दुपारी १२ वाजता, प्रभाग समिती तीनसाठी दुपारी १ वाजता सभा होत आहे. सभापती निवडीसाठी कोरे नामनिर्देशन पत्र दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नगर सचिव यांच्या कार्यालयात उपलब्ध राहतील. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नगर सचिव यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. पाच ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्राची छानणी ऑनलाईन विशेष सभा सुरु झाल्यावर होईल. छाननीनंतर १५ मिनिटाच्या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. त्यानंतर त्याच दिवशी आवश्यकता भासल्यास मतदान होईल.

Pages