राजकीय ब्रेकिंग : आ.बंटी भांगडिया सहित 12आमदार निलंबित :पावसाळी अधिवेशनाची (monsoon season Maharashtra) वादळी सुरुवात #banti-bhagdiya - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राजकीय ब्रेकिंग : आ.बंटी भांगडिया सहित 12आमदार निलंबित :पावसाळी अधिवेशनाची (monsoon season Maharashtra) वादळी सुरुवात #banti-bhagdiya

Share This
खबरकट्टा / राजकीय : 

पावसाळी अधिवेशनाची (monsoon season Maharashtra) सुरुवात वादळी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबित करण्यात आले आहे. 1 वर्षासाठी 12 आमदारांना निलंबित करण्यात आले असून सभागृहात ठराव मंजूर करण्यात आला आहे. (12 BJP MLAs suspended for a year)

राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडला. पण, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. एवढंच नाहीतर सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की सुद्धा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांची बैठक पार पडली. सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामुळे भाजपचे डझनभर आमदार निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

या आमदारांचं झालं निलंबन

१) गिरिश महाजन

२) संजय कुटे

३) अभिमन्यु पवार

४) आशिष शेलार 

५) पराग आळवणी

६) योगेश सागर

७) राम सातपुते

८) नारायण कुचे

९) अतुल भातखळकर

१०) बंटी भागडिया

११) हरिष पिंपळे

१२) जयकुमार रावल

Pages