चंद्रपूर जिल्ह्याचे राजकारण सध्या जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची गच्छंती होणार की नाही या चर्चेने ढवळून निघाले आहे, पण या सोबतच आणखी एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांची. रामू तिवारी यांच्या कारकिर्दीला परवा एक वर्ष झाले त्या प्रित्यर्थ रामू तिवारी खासदार बाळू धानोरकर यांच्या कडे गेले केक कापुन आले मग त्यांनी खासदारांच्या हातून केक देखील भरवून घेतला , पण याच तिवारी यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असतांना कार्यकर्त्यांची मिटिंग रद्द झाली म्हणून शिव्यांची लाखोळी देखील खासदार बाळू धानोरकर आणि पालकमंत्री यांना वाहिली.
हिराई रेस्ट हाऊस च्या परिसरात 50 काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांना अतिशय खालच्या भाषेत तिवारी यांनी शिवीगाळ केली. ज्या खा.बाळू धानोरकर यांनी तिवारी यांना अध्यक्ष केले त्यांची सुद्धा गय आणि आदर तिवारी यांनी केला नाही. तिथे अनेक लोक उपस्थित होते या संबंधी ची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना आणि बाळू धानोरकर यांना देखील अनेक कार्यकर्त्यांनी दिली.
रामू तिवारी यांचे हे वागणे पहिल्यांदा किंवा नवे नाही थोडे काही झाले की पारा चढवून शिव्या देणे, स्वतःच्या मनाविरुद्ध थोडे जरी घडले की रुसणे यातच त्यांचे दिवस चालले आहे. या एक वर्षाच्या काळात रामू तिवारी यांनी कोणतेही आंदोलन स्वतःहून घेतले नाही महानगर पालिकेत भाजपची सत्ता आहे, पण रामू तिवारी यांनी महानगरपालिके च्या विरोधात कधी आंदोलन घेतलेले कोणी पाहिले नाही.
तिकीट मिळाली नाही म्हणून हे महाशय भाजपात गेले पण तिथे यांची डाळ शिजली नाही यांचा माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांनी 1500 पेक्षा जास्ती मताने नामुष्कीजनक पराभव केला. शेवटी यांना भाजप मध्ये काहीही किंमत मिळाली नाही म्हणून हे पुन्हा काँग्रेस मध्ये आले, काँग्रेस ची संस्कृती आहे की इथे संयम खूप महत्वाचा आहे पण यांना शहर अध्यक्षपदाची घाई झाली होती, याकाळात यांनी अनेकदा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्या थोडं काही मनाविरुद्ध झाले की हे लोकांना शिवीगाळ करतात ते असो. पण एक वर्षा च्या कालखंडात यांनी संघटन वाढीसाठी सुद्धा प्रयत्न केले नाही दोन चार चेले चपाट्या च्या वरती काँग्रेस वाढवली नाही.
आज पक्षाला रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज असतांना या माणसाचे मात्र वेगळेच उद्योग सुरू असतात. रुसण्या फुगण्या मध्ये नव्या नवरीसारखे एक वर्ष यांनी वाया घालवले सकाळी काँग्रेस तर रात्री भाजपा असा यांचा खेळ सूरु असतो. अनेक बाबतीत ते भाजपा नगरसेवकांची बाजू मांडताना अनेक चर्चेत आढळतात.
आता जे जाऊ द्या यांच्या एक वर्षा च्या कार्याचा लेखाजोखा असा की यांनी एक साधी पत्रकार परिषद महानगरपालिके विरुद्ध घेतली नाही, यांनी अजून पर्यँत यांची कार्यकारणी घोषित केली नाही त्यामुळे ज्यांना यांनी पद देतो म्हणून पक्षात घेतले ते लोक सुद्धा आता कंटाळले आहेत. यांनी अजून एकाही वॉर्डाची कार्यकरणी देखील केली नाही कोणी वॉर्ड अध्यक्ष नाही, महानगरपालिका निवडणूक केवळ सात महिन्यावर आली असतांना यांचे शहरात काहीही काम नसणे आश्चर्य कारक आहे त्याच सोबत भाजपला मात्र फायद्याचे आहे.
इतके घोटाळे महानगरपालिकेत होत असतांना विरोधी पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणून तिवारी यांची कामगिरी मात्र शून्य आहे. त्यामुळे काँग्रेस ला असे शहर अध्यक्ष मिळाले म्हणून भाजप मात्र आनंदात आहे. काँग्रेस चे मूठभर नगरसेवक महानगरपालिकेचा विरोध करतात मात्र त्यांना साथ शहराध्यक्षांची मिळत नाही.
नुकतीच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत 2015 साली महानगरपालिकेत जो 200 करोड चा घोटाळा झाला त्या बद्दल चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले.
आता यात सगळ्यांना वाटेल काँगेस च्या मंत्र्यांनी चौकशीचे जे आदेश दिले तर शहर अध्यक्षांनी तर महानगरपालिके विरोधात रान उठवले पाहिजे पण तसे काही घडले नाही उलट पत्रकार परिषदेतच शहर अध्यक्ष रामु तिवारी यांचे तोंड पडले कारण ज्या 200 करोड च्या घोटाळ्या च्या चौकशी चे आदेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले तो घोटाळा जेव्हा झाला तेव्हा रामू तिवारी स्थायी समिती सभापती होते.
11 नगरसेवक सोबत घेऊन त्यांचे राजकिय गुरू नरेश बाबू पुगलिया यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी आपली वेगळी चूल मांडली होती आपल्या राजकीय गुरूंना धोक्याची गुरुदक्षिणा तिवारी यांनी देऊन स्थायी समिती सभापती पद मिळवले. यात चौकशी पूर्ण झाल्यावर कोण दोषी कोण निरपराधी हे समजेलच परंतू 200 करोड चा विषय निघाला की तिवारी यांचा पारा सातव्या आस्मानात जातो ही बाब विचार करण्यासारखी आहे.
26 जून ला ओबीसी च्या राजकीय आरक्षणासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण राज्यात हे आंदोलन करण्याचं आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केले होते. त्याचदिवशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणि बाणी लागू केली होती म्हणून भाजप काळा दिवस पाळणार होते. त्या प्रित्यर्थ याच आंदोलनात सर्व काँग्रेस च्या कार्यकर्त्यांना संविधानाची शपथ सुद्धा घ्यायची होती. या आंदोलनाचे आयोजन शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी केले होते. त्यांनी आंदोलन तर केले पण संविधानाची शप्पथ मात्र घेण्याचा त्यांना विसर पडला आंदोलनातील जो महत्वाचा गाभा होता ते तो विसरले मग पुन्हा फजिती झाली म्हणजे त्यांनी गावभर जे पोस्टर बॅनर आंदोलना चे लावले होते ते लगेच काढले कारण त्यात संविधानाची शप्पथ घेणार असा उल्लेख होता, अशा वागण्यातून त्यांनी त्यांच्या सोबत काँग्रेस पक्षाचे सुद्धा हसे केले.
या सर्व प्रकारामुळे तिवारी यांच्या असंख्य तक्रारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे गेल्या आहे. नाना पटोले जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी सर्व पदाधिकर्यांनी कोविड काळात काँग्रेस पक्षाकडून काय सेवा केली याचा आढावा घेतला. तिवारी यांनी कोरोना काळात देखील काहीही कार्य केले नाही प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशावरून एक हेल्पलाईन फक्त सुरू केली पण त्या काळात यांनी कधीही लोकांचे फोन उचलले नाही, ना औषध पुरवठा ना रक्तदान शिबिर त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुद्धा तिवारी यांच्या वर नाराज आहेत.
या दरम्यान पटोले यांनी रामू तिवारी यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा भेट दिली तेव्हा सर्वांसमक्ष महानगरपालिका निवडणूक हरली तर सर्वात आधी तुझा राजीनामा घेईल असा दम दिला.तरीसुद्धा तिवारी यांनी कार्य तत्परता दाखवली नाही अजूनही त्यांचे रुसणे फुगणे सुरूच आहे. फक्त गावभर बॅनर लावणे या खेरीज यांचे काहीही कार्य नाही त्याच सोबत चांडाळ चौकडी घेऊन बसणे हे काम म्हणजेच त्यांना पक्षकार्य वाटते.
पुढील वर्षी होणारी महानगरपालिका निवडणूक पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या साठी अतिशय प्रतिष्ठेची आहे परंतु शहर अध्यक्ष तिवारी यांची कार्यशैली बघता निवडणूक सुरू होण्याआधी च काँग्रेसचा पराजय लोक पक्का समजत आहे.
त्यामुळेच जर जिल्हाध्यक्ष देवतळे यांचे पद गेल्यास सोबत शहर अध्यक्ष तिवारी यांचे देखील पद जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सर्व बाजुने पोषक वातावरण असतांना देखील पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला असून देखील,दारूबंदी उठवली तरी सुद्धा शहर अध्यक्ष यांच्या मुळे निवडणुकीच्या आधीच काँग्रेस चा पराजय दृष्टीस दिसतो आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शहरात उमटत आहेत, तुर्तास इतकेच!!

