राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व कोलारपिंपरीचे माजी सरपंच महेश पिदूरकर, वय अंदाजे 48 यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना नागपूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यात आले होते, दिनांक 23 ला सायंकाळी 8.40 वाजता उपचारा दरम्यान नागपूर येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
महेश पिदूरकर यांची गेल्या महिन्यात प्रकृती बिघडली होती. त्यांना नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले होते. त्यातून सावरत त्यांना गेल्या आठवड्यात सुटी देण्यात आल्याने ते वणीत परत आले होते. मात्र काही दिवसांनी त्यांची प्रकृती आणखी खालवल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दिनांक 23 ला रात्री 8.40 वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, पत्नी व बरचमोठा आप्त परिवार आहे.
