जिल्हातील अतिदुर्गम भाग म्हणून झरी तालुका असून मुकुटंबन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अद्यापही ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची उपलब्ध नव्हते.परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा कोरोना रुग्ण आरोग्य केंद्राला आल्यास रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सट्रेटर नसल्याने रुग्णाला व परिसरातील जनतेला आपल्या रुग्णाला वणी ,चंद्रपूर ठिकाणी हलवावे लागत होते.
यातच जगात कोरोना च्या लाटेने हाहाकार केला असून कोरोना रोगाने अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला आहे. यातच आरोग्य विभागाने देश्यावर तिसऱ्या लाटेचा येणाच्या अंदाज वर्तवला असताना , मा.अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडून सर्वोत्तर उपयोजना करण्याचे प्रयत्न होत आहे.
यातच यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामनी तालुक्यातील प्रा.आरोग्य केंद्र मुकुटबंन येथे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर नसल्याची मागणी सामजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी फोन द्वारे व पत्रव्यवहार करून मा. सुधीरभाऊ कडे केली असता सुधीर भाऊ यांनी तात्काळ मुकुटबंन येथे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून युवा सामजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई पाठपुरावामुळे मुकुटबंन येथे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर पाठविण्यात आले व पुढील संभाव्य कोरोना रुग्णासाठी व इतर रुग्णासाठी एक दिलासादायक ठरले यावेळी उपस्थित आरोग्य अधिकारी पंडित साहेब तसचे दत्ता लालसरे,गणेश पेटकर,राहुल ठाकूर,सुधीर पाचभाई,जगदीश चांदेकर तसेच गट प्रवर्तक नगराडे मॅडम ,मुकुटंबन आशा सेविका उपस्थित होत्या.

