देशात कोरोना ची दुसऱ्या लाटेने हाहा कार माजला आहे अनेक रुग्णांना बेड ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागत आहे यातच अनेक लोक प्रतिनिधी घरात बसले असून अडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे हे जनतेत जाऊन कोरोना रूग्णा ना मदत करत आहेत.
रुग्णाना बेड असो की प्लास्मा सर्व स्तराहून मदत करताना सामजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई दिसत असतात यातच अडेगाव येथील कोरोना ग्रस्त रुग्णांना मदतीचा हात म्हूणून मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांनी अडेगाव येथील कोरोना ग्रस्त रुग्णांना फळे ,पोस्टिक अश्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रुग्णांना मदतीचा हात सोबतच कोरोना ग्रस्त घरात निर्जंतुकरण करण्यात आले सोबतच रूग्णाना मानसिक आधार दिला या मदतकार्याला ग्राम पंचायत चे सददश संतोष पारखी याच मोलाचे सहकार्य लाभलं या कार्यात सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई ,सरपंच सीमा लालसरे , प्रणल गोंडे,राहुल ठाकूर,विवेक पुरके,मारोती गोंडे,धनंजय पाचभाई ,संजय आत्राम,राहुल पाचभाई सर्व युवकांचे मदत कार्यास सहकार्य लाभले.





