सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट असून सर्वत्र रुग्णवाढीने भीतीदायक वातावरण पसरले असल्याने मा जिल्हाधिकारी अमोल येडगे यवतमाळ यांनी कडक निर्बंध जाहीर केले असल्याने त्याचे पालन आता नागरिकांनी व व्यापाऱ्यानी एकजुटीने करीत असल्याचे दिसुन आले दरम्यान दुपारी रस्त्यावर दिसून येणाऱ्या गर्दीच्या ऐवजी वणीतील रस्तेच सुनसान झाल्याचे दिसून आल्याने जनतेनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी असेच एकजुटीने नियमांचे पालन करीत शासनाला सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.
काही दिवसा अगोदर वणीत जणू लोकांची झुंबळ पहावयास मिळत होती दिलेल्या निर्धारित वेळे नंतरही दुकाने उघडून छुप्या पद्धतीने व्यापारी आपला व्यवसाय करीत होते काहींवर कारवाई सुद्धा करण्यात आली काहींची दुकाने सुद्धा सील करण्यात आली, जिल्हाधिकारी यांचे वणीत आगमन होताच कडक निर्बंधाची नियमावली जाहीर होताच वणीतील प्रशासनाने देखील आता कोरोनाला हरविण्याकरिता कंबर कसून कारवाईला सुरवात केली असून, वणीतील मुख्य रस्ता व बाजारपेठेत संपूर्ण सुकसुकात पहावयास मिळाला असून, तर त्या पाठोपाठ जनतेनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला असल्याचे चित्र सुनसान वणीतील रस्त्यांना पाहून दिसत आहे. असाच प्रतिसाद वाणीकरांनी दिल्यास कोरोनाला निस्तनाभूत करण्यास आपल्याला यश येणार आल्याचे दिसते.


