आंध्र सरकार प्रमाणे महाराष्ट्रातही संपूर्ण दवाखान्यात निशुल्क उपचार व्हावा .... राकेश खुराणा... मुखमंत्र्याना मागणी :- साहेब गोरगरीब जनतेनी दवाखाण्यात लाखो कुठून भरावे?#wani. - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आंध्र सरकार प्रमाणे महाराष्ट्रातही संपूर्ण दवाखान्यात निशुल्क उपचार व्हावा .... राकेश खुराणा... मुखमंत्र्याना मागणी :- साहेब गोरगरीब जनतेनी दवाखाण्यात लाखो कुठून भरावे?#wani.

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : वणी :- सूरज चाटे

सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार सुरू असून परिस्थिती हाताबाहेर होत आहे, बेड उपलब्ध नाही, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, दवाखान्यात जागा शिल्लक नाही असे असताना जिथे आहे तिथला खर्च सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला झेपण्याजोगे नसून त्यामुळे कोरोनारुग्ण मोठ्या प्रमाणात दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच प्लाझ्मा मिळत नसून सगळीकडे तुटवडा भासत आहे ज्यादा दराने त्याची विक्री सुरू असून महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आंध्रप्रदेश सरकार प्रमाणे महाराष्ट्रातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतील खाजगी दवाखान्याना तसे आदेश देऊन त्यांना कोरोना रुग्णांचे मोफत उपचार करावे अशी मागणी वणीतील कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी, क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा व्यापारी असोसिएशन वणी चे अध्यक्ष राकेशभाऊ खुराणा यांनी यांनी केली आहे. 

संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार पसरत असून सर्वत्र परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे, विविध स्तरातून नागरिक मदतीची अपेक्षा करीत असून महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती मोठी बिकट झाली आहे. आरोग्य विभाग जरी कसून कामाला लागला असला तरी अजून पर्यंत पाहिजे तस यश हाथी लागलेलं नाही, रुग्णालयात बेड उपलब्ध नाही, ऑक्सिजन अपुरे, व्हेंटिलेटर नाही, प्लाझ्मा उपलब्ध नाही तसे असताना स्मशानभूमी मध्ये सुद्धा जागा अंतिम संस्काराकरिता थांबावेच लागत असून अशा एक ना अनेक अडचणी कोरोना रुग्णासमोर उभ्या राहत असून गरजेच्या उपाययोजना अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.


परिस्थिती हाताबाहेर होऊ नये हे लक्षात घेता आंध्रप्रदेश सरकार चे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी संपूर्ण शासकीय व खाजगी दवाखान्यात कोरोना रुग्णांचा मोफत उपचार करण्याचा आदेश दिला आहे, तसेच कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकाला 15000/- आर्थिक मदत तसेच प्लाझ्मा दान करणाऱ्यास 5000/- मदत देण्याची घोषणा केली आहे


या आदेशाने तेथील जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा झाला असून अशाच प्रमाणे जर आंध्रप्रदेश सारखे छोटे राज्य अशी तातडीची घोषणा करू शकते मग सर्व बाबींनी सुसज्ज व तत्पर असणारे महाराष्ट्रात अशी घोषणा का नाही?.. याचाच विचार करून महाराष्ट्रातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतील खाजगी दवाखान्याना कोरोना रुग्णांना मोफत उपचार घेता यावा जेणेकरून उपचारा अभावी दगावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होईल त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आंध्र सरकार प्रमाणे सर्व दवाखाने मोफत करावे, प्लाझ्मा दान करणाऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी वणीतील कॉग्रेस पक्ष पदाधिकारी, क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राकेशभाऊ खुराणा यांनी केली आहे.

Pages