चंद्रपूर ब्रेकिंग अटक : डॉ. जावेद सिद्दीकी यांना रेमडेसिव्हि काळाबाजार प्रकरणी अटक : काळाबाजार करणाऱ्या दोघांना अन्न व औषध विभागाने रंगेहात पकडले : डॉ. सिद्दीकी सोबत दोन नर्सेसही अटकेत : एकूण 5 जण अटकेत : #dr-jawed-siddiqui-arrested-in-remdesivir-black-marketing-in-chandrapur) - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर ब्रेकिंग अटक : डॉ. जावेद सिद्दीकी यांना रेमडेसिव्हि काळाबाजार प्रकरणी अटक : काळाबाजार करणाऱ्या दोघांना अन्न व औषध विभागाने रंगेहात पकडले : डॉ. सिद्दीकी सोबत दोन नर्सेसही अटकेत : एकूण 5 जण अटकेत : #dr-jawed-siddiqui-arrested-in-remdesivir-black-marketing-in-chandrapur)

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 


शहरात काल शुक्रवारी दुपारीच झालेल्या रेमडेसिव्हिर काळाबाजार (remdesivir black market) धाड प्रकरणाच्या पोलिस तपासात रात्री उशिरा धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

शहरातील क्राईस्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना काळाबाजाराप्रकरणी रात्री अटक करण्यात आली आहे. क्राईस्ट रुग्णालयातील या गैरप्रकारात डॉक्टरला मदत करणाऱ्या 2 नर्सेसला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 



काल शुक्रवारी शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अन्न व औषध विभागाने रंगेहात पकडले आहे. आशय उराडे आणि प्रदीप गणवीर, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. ही कारवाई गांधी चौक जवळील पुगलीया गल्ली येथे दुपारच्या सुमारास करण्यात आली. हे दोघे प्रत्येकी 25 हजार रुपयाला इंजेक्शन विकणार असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली होती. त्यानंतर अन्न व औषध विभाग व शहर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.


क्राईस्ट रुग्णालयाला शहरातील मुख्य शासकीय कोविड केंद्राएवढेच महत्व आहे. इथली खाटांची आणि उपचाराची क्षमता लक्षात घेता हे केंद्र कोविड उपचारात मोठे योगदान देत आहे. शुक्रवारी रात्री अन्न व औषध प्रशासन पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे गांधी चौक या गजबजलेल्या भागात रेमडेसिव्हीर विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना धाड घालून ताब्यात घेतले होते.


गुन्हा नोंद करून हा तपास शहर पोलिस ठाण्याला सोपविण्यात आला होता. त्यानुसार माघ काढत पोलिस क्राईस्ट रुग्णालयापर्यंत पोहोचले. आता या प्रकरणात एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. शहर-जिल्ह्यात होत असलेल्या रेमडेसिव्हिर काळाबाजाराचे हे धक्कादायक वास्तव आहे. या रुग्णालयाला वितरित होणारे इंजेक्शन इथली टोळी चढ्या किंमतीत बाहेर विकत असल्याचा खुलासा झाला आहे.

💉 रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट सक्रिय -
सध्या कोरोना महामारीत आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे चित्र आहे. रुग्णांना बेडदेखील मिळत नाही. जे रुग्ण गंभीर आहेत त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असते. पूर्वी ही यंत्रणा या औषधाच्या वितरकांकडे होती. त्यात अनेकांना हे इंजेक्शन मिळत नव्हती. ही संपूर्ण प्रणाली संशयास्पद होती. त्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारीदेखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात होत्या. त्यानंतर ही यंत्रणा जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात गेली. मात्र, असे असतानादेखील रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट सक्रिय आहे, हे आता प्रशासनाने केलेल्या करवाईतून समोर आले आहे.

या टोळीने किती इंजेक्शन अशारीतीने बाहेर विकले, याची सत्यता पोलिस चौकशीत कळणार आहे. हे इंजेक्शन रुग्णाच्या नावे वितरित होत आहेत. त्यामुळे पैशाच्या लोभापायी किती रुग्ण इंजेक्शनविना मरण पावले, याची कल्पना डोकं सुन्न करणारी आहे. रेमडेसिव्हिर काळाबाजाराची ही साखळी कुठवर जाते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

#dr-jawed-siddiqui-arrested-in-remdesivir-black-marketing-in-chandrapur



Pages