खबरकट्टा / यवतमाळ : वणी :
वणी शहरालगतच्या शेजारीच असलेले छोरी या ले आउट मधील साई निवास अपार्टमेंट मधील शर्मा यांच्या घरी आग लागल्याची घटना दिनांक 27 च्या संध्याकाळी 8.3० दरम्यान घडली आहे.
वणीतुन काहीच अंतरावर असलेल्या छोरिया ले आऊट मधील साई निवास अपार्टमेंट मध्ये आकाश शर्मा यांच्या फ्लॅट ला आग लागल्याची घटना कळताच वणी अग्निशामक विभागाची चमू तात्काळ दाखल होऊन आग रुद्र रूप घेण्या अगोदर त्यावर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक विभागाला यश आले व मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून मात्र समानांची नासधूस व फ्लॅट चे नुकसान मात्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली असावी हे अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही, मात्र बघ्यांच्या गर्दीतून विविध अंदाज लावला जात होता.