मासविक्रेत्याची गाडी जप्त करताच त्याने घेतले आक्रमक रूप..... पोटाची खडगी भागणार कशी? :- तहसिलदार यांच्या गाडी समोर लोटांगण.... वणी :- सुरज चाटे #wani - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मासविक्रेत्याची गाडी जप्त करताच त्याने घेतले आक्रमक रूप..... पोटाची खडगी भागणार कशी? :- तहसिलदार यांच्या गाडी समोर लोटांगण.... वणी :- सुरज चाटे #wani

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : वणी : 

वणीतील प्रसिद्ध दीपक चौपाटी परिसरात नेहमी नित्याने आपला मास चा ठेला लावणारे दादाजी पोटे यांच्यावर दिनांक 27 ला सकाळी 10.30 च्या दरम्यान नगर परिषद येथील जप्ती पथकाने त्यांच्या ठेल्यावर कारवाई करीत त्यांचा ठेला जप्त केला, त्यानंतर दादाजी पोटे यांनी आक्रमक भूमिका घेत चक्क तहसीलदार यांच्या गाडीसमोर झोपून ''शासन विरोधी घोषणा देत'' मी गरीब माणूस काय करणार? माझे कुटुंब कसे जगणार? माझा ठेला जप्त केलाच कसा? असेच प्रश्न उपस्थित करून जो पर्यंत ठेला सोडणार नाही मी उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. 

रंगनाथ नगर येथील रहिवासी असलेले यवतमाळ जिल्ह्याचे माहिती अधिकारी संघटक व प्रचारक दादाजी पोटे हे घडी, चष्मे, विविध खिलोने, पर्स, आदींचा आपल्या छोट्या ठेल्यावरच व्यवसाय करतात. मात्र लॉकडाऊन असल्याने दीपक चौपाटी परिसरात मास्क विक्रीचा व्यवसाय ते अनेक दिवसापासून करीत आहे. दिनांक 27 ला सकाळी 10.30 च्या दरम्यान नगर परिषदेचे जप्ती पथक त्यांच्या हातगाडीसमोर आले व त्यांनी पोटे यांना गाडी हटविण्यास सांगितले. काही वेळ झाला तरी पोटे यांनी गाडी हटविली नाही. तेव्हा नगर परिषद जप्ती पथकाने त्यांची हातगाडी मालासह जप्त केली. त्यांचे मालासह वाहन घेऊन जात 

असताना दादाजी पोटे हे चक्क शहीद भगतसिंग चौक जवळ ट्रॅक्टरच्या मागे जात असतांनाच काठेड ऑइल मिल जवळ तहसीलदारांची गाडी पाहताच. त्यावेळी पोटे यांनी आपली भूमिका मांडली आपल्या व्यथा व्यक्त केल्या, आम्हाला मारून टाका, गोरगरीबानी जगावे तरी कसे? असे प्रश्न उपस्थित करीत चक्क तहसीलदारांच्या गाडीसमोर झोपले. 

दरम्यान चांगलीच गर्दी जमा झाली होती मात्र, यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात येऊन गर्दी कमी करत पोटे यांना गाडीत घेऊन गेले, मात्र त्यांच्या मालासह ठेला त्यांना परत देण्यात आला. 


पालिकेचे काही कर्मचारीच बनले अधिकारी?

वणीतील पालिकेचे जप्ती पथकामधील काही कर्मचारीच अधिकाऱ्यांपेक्षाही अधिकाऱ्याची भाषा करीत असतात. अधिकारी आपल्या जागीच राहत असून कर्मचारी मात्र अधिकाऱ्याची जागा घेत मुजराई करतांना दिसतात अशांवर देखील संबंधित अधिकाऱ्यांनी वचक ठेवणे गरजेचे झाले आहे, ज्यामुळे गोरगरिबांना त्रास होणार नाही.

Pages