सहकार विभागातिल एक अतिशय उत्साही, अभ्यासू, कार्यक्षम आणि होणहार अधिकारी चंद्रपुर-गड़चिरोली जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे वय 41 वर्ष यांचे मुंबई येथे निधन झाले.मागील महिन्यात कर्त्यव्यावर असतांनाच त्यांचा कोविड अहवाल हा पॉज़िटिव आलेला होता. त्यांना चंद्रपुर येथे काही दिवस भरती केल्यानंतर नागपुर येथे हलविन्यात आले. मात्र प्रकृतित सुधारना न झाल्याने त्यानां मुंबई येथे भरती करण्यात आलेले होते.मात्र त्यांची आज दिनांक 28 ला प्राण ज्योत मालवली.सहकार क्षेत्रातील अतिशय हुशार व्यक्तिमत्वाचे ते धनी होते.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात बदल करण्यासाठी त्यांनी नवीन नवीन उपक्रमाला सूरूवातही केलेली होती.अटल पणन अभियानात मधे जिल्ह्यात सर्वाधिक सहकारी संस्था स्थापन करुन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता तर महात्मा फुले कर्ज योजनेमधे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी भरीव कार्य केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक झालेले होते.
खाड़े यांच्या मृत्यु मुळे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून त्यांचा मागे आई,पत्नी 1मुलगा व 1 मुलगी असा परिवार आहे.खाड़े साहेब यांच्या निधना बद्दल सर्वत्र त्यांना श्रदांजली अर्पण करित आहे.
