'मदतीचा एक घास' या उपक्रमाला आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या उपाध्यक्षा आणि वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली. आज स्वतः आमदार प्रतिभा धानोरकर यांनी घरून ३० डब्बे आणले होते.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या वतीने संपूर्ण राज्यात मदतीचा एक घास हा उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मागच्या शनिवारी या उपक्रमाचे उदघाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
आज आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सहाव्या दिवशी स्वतः या उपक्रमाला भेट देऊन कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण वितरित केले. या वेळी काँग्रेस कार्यकर्ते राजेश सिंग चौहान यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्या प्रीत्यर्थ त्यांनी देखील आपल्या घरून डब्बे आणून वितरित केले त्याच प्रमाणे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश भाऊ चोखारे यांनी गरजूंना जेवण वितरित केले.
महाकाली वॉर्ड प्रभागातील नगरसेविका कल्पना लहामगे यांनी देखील उपस्थित राहून जेवण वितरित केले. या वेळी प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, जिल्हा उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, शहर उपाध्यक्ष स्वाती त्रिवेदी, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, सचिव वाणी डारला, चेतना शेटे वरोरा सोशल मीडिया च्या अध्यक्ष , यशोदा खामनकर ,सदस्य लता बारापत्रे उपस्थित होत्या.

