ब्रेकिंग चंद्रपूर : रेल्वेत कटून मेल्याचा आणला आव पण मुलगाच निघाला बापाचा मारेकरी :: अवघ्या काही तासात पोलिसांनी ठोकल्या मारेकरी मुलास बेड्या :#murder - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ब्रेकिंग चंद्रपूर : रेल्वेत कटून मेल्याचा आणला आव पण मुलगाच निघाला बापाचा मारेकरी :: अवघ्या काही तासात पोलिसांनी ठोकल्या मारेकरी मुलास बेड्या :#murder

Share This

 खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


आज सकाळी राजुरा तालुक्यातील सिंधी गावानाजिक रेल्वे रुळावर गावातील तिरुपती तातोबा धानोरकर (वय -43) यांचा मृतदेहाचे दोन तुकडे झालेल्या अवस्थेत आढलल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

घटना लक्षात येताच रेल्वे पोलिसांनी आकस्मिक अपघाताचा मर्ग विरूर पोलीस ठाण्यात दाखल करताच चंद्रपूर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या सूचनेनुसार विरूर ठाणेदार किष्णा तिवारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तात्काळ घटना पंचनामा करत तपासाची चक्रे फिरविली असता प्रथमदर्शनी ही रेल्वेत कटून मृत झाल्याची घटना् दिसत असली तरी मृत शरीराच्या निरीक्षणावरून घातापाताची दाट शक्यता समोर आल्याने काही संशयितांना पोलिसी धाक दाखवताच आरोपीकडून धक्कादायक खुलासा उघडकीस आला.

यात मृतकाच्याच मुलाने पैश्याच्या वादावरून आधी डोक्याला जबर मारहाण केल्याने मृत्यू झाल्यावर रात्री मृत शरीर गावानाजिकच्या रेल्वे रुळावर नेऊन टाकल्याने, त्यावरून रेल्वे गाडी गेल्याने मानेपासून धड कटून, दोन तुकडे झाल्याने मृत्यू झाल्याचा आव अनन्यात आला होता.


परंतु पोलिसांच्या तत्परतेने तात्काळ मृतकाचा मारेकरी मुलगा निखिल धानोरकर याने घरात शेती विकल्यानंतर आलेल्या पैश्यावरून वाद असल्याने वडिलांना आधी बैलबंडीच्या उभारीने डोक्याला्क मारहाण केली व त्यानंतर रूळवर नेऊन टाकल्याचे मान्य केले असून पुढील तपास  उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात विरूर ठाणेदार किष्णा तिवारी व स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय बोबडे, पीएसआय कापडे, पोहवा नईम खान,पोहवा भुजाडे, पोहवा खनके,मिलिंद चव्हाण, अनुप डांगे,प्रफुल मेश्राम, मयूर येरणे, जमीर खान पठाण करीत आहेत.



Pages