जगभरात सध्या कोरोणाने आपले थैमान घातले असताना उन्हाचा पारादेखील दिवसागणिक वाढत आहे त्यात कूलर, पंखे,एसी सुद्धा काम करत नसल्याने गर्मीने लायी लायी होत असताना वीजेच्या लपंडावाणे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहे त्यामुळे उन्हाचा पारा, कोरोनाचा मारा अन विजेच्या येरजारा असेच म्हणण्याची वेळ आल्याचे दिसत आहे.
सध्या उन्हाचा पारा उच्चाकं गाठत असून दिवसागणिक वाढतच आहे त्यामुळे गर्मीने जीव कासावीस होत आहे घरचा पंखे, कुलर, एसी आदी साधने असून सुद्धा उन्हापुढे आव्हानात्मक ठरत असून काही प्रमाणात निकामीच ठरत आहे मग कुठं जास्त वेळ सुरू राहल्यावर थंड वाटतात त्यातच वीज मात्र गोल होत असल्याने त्याचा फेर पुन्हा सुरू मग वीज ये तोपर्यंत हवा गायबच त्यामुळे दिवसागणिक वाढत चाललेला विजेचा लपंडाव नागरिकांची डोकेदुखी वाढविणारा असल्याने ग्राहकाच्या अडचणी वाढल्या आहे. तर वीज कधी येणार याची विचारणा करण्याकरिता व चौकशी करिता ठेवण्यात आलेले क्रमांक हे सुद्धा संपर्क क्षेत्राच्या बाहेर, तर कधी व्यस्तच व्यस्त असे असताना नेमकी माहिती घ्यायची तरी कुठून हाच पेच निर्माण झाला आहे.
वीज विभाग सुद्धा कोरोनाच्या काळात कसून कामाला लागला असून ते सुद्धा आपली सेवा नित्याने देत आहे मात्र विजेचा लपंडाव रोजचाच झाल्याने नेमकं काय होतंय, कुठं काही अडचण आहे काय? हाच एकमात्र नागरिकांत चर्चेचा विषय ठरत आहे.
