चिमूर च्या आमदारा विरुद्ध शिवीगाळ करणाऱ्या हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या दलालावर गुन्हा दाखल #chimur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चिमूर च्या आमदारा विरुद्ध शिवीगाळ करणाऱ्या हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या दलालावर गुन्हा दाखल #chimur

Share This
खबरकट्टा /चिमुर : -


कोरोनाची महामारी संपूर्ण राज्यात सुरू असतांना चिमूर शहरातील हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर चुकीच्या पध्दतीने उपचार करून रुग्णांना मारण्याचे काम या साईनाथ उर्फ अश्वमेघ बुटके या तोतया डॉक्टर व दलालाने केले. याबाबत दिनांक.०५/०५/२०२१ ला सविस्तर माहिती व तक्रार आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना प्राप्त होताच क्षणी तात्काळ याची दखल घेत उपविभागीय अधिकारी तसेच वैधकीय अधीक्षक यांना या जीवघेणा हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या चौकशीचे आदेश दिले.


चौकशी दरम्यान दिलेली तक्रार ही सत्य ठरली कोविड रुग्णांवर अयोग्य पद्धतीने उपचार व रुग्णांकडून २ लाख रुपयांची लूट घेत असतांनाचा प्रकार समोर आल्याने दुसऱ्याच दिवशी दिनांक.०६/०५/२०२१ ला जिल्हाधिकारी यांनी हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिमूर ची ( DCHC ) ची मान्यता रद्द केली.व साथरोग अधिनियम १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ , कलम ३३ , ३४ , ५१ , ५६ , ५७ , ५८ , ६३ , ७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत संपूर्ण वृत्तपत्रात व टिव्ही वर बातमी प्रकाशित झाली.


म्हणून या साईनाथ उर्फ अश्वमेध बुटके दलालाने फेसबुक तथा व्हॉट्सअप वर चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांच्या बद्दल अपशब्द लिहून जनतेत वायरल केले. याबाबत ची चिमूर पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली असता गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

Pages