आज सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान भाजीपाल्याचे पीक अप MH-33C2481हा नागपुर वरून ब्रह्मपुरी मार्गाने चामोर्शि ला भाजीपाला भरून जात असतांना विद्यानगर रूई जवळ एक जण आंबे विकण्यासाठी ब्रह्मपुरी ला जात असलेल्या व दुसरा शेतीवर जात असलेल्या पिकअप वाहन चालकाचे गाडी वरुन नियंत्रण सुटल्याने दोन्ही सायकलस्वारांना जबर धडक दिली.
यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला व पण दुसरा गंभीर जखमी असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे उपचारासाठी नेण्यात आले. जखमी असलेल्या व्यक्तींची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे हलवण्यात आले. आंबे विकायला नेणाऱ्या मृत्यु का चे नाव ललित श्रीराम चौधरी वय 45 असून तो निलज येथील रहिवाशी आहे. जात असलेला इसम सदाशिव प्रधान वय 50 रहिवासी रुई असे आहे.पिकअप वाहन चालक फरार झाला असून ब्रम्हपूरी पोलिस तपास करीत आहेत.

