चिमुर तालुक्यातील नेरी येथील शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापारी प्रतिष्ठाने पुर्णतः बंद ठेवून शंभर टक्के बंद पाळण्यात आला आहे.
सरकारचे शेतकरी विरोध धोरण असल्याने दिवसेंदिवस शेतकरी कष्टकरी नागावल्या जात आहे .शेतकरी अन्नदाता असला तरी तो सगळ्यात गरीबी चे जिवन जगत आहे. याला सरकारचे धोरण जबाबदार असल्याचे म्हटलें जात आहे.
केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेली १२ दिवसापासून देशाच्या राजधानीत दिल्ली येथे विविध राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेण्यास अपयशी ठरत आहे .नव्याने केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करा आणि बळीराजा च्या हितासाठी कायदे करा या मागणी साठी या मागणीसाठी ८ डिसेंबर ला भारतबंदचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने नेरीत आज पूर्णतः कडकडीत बंद पाळीत बाजारपेठ बंद ठेवण्यात आले आहे.
